मुंबई : मुंबईत मराठा क्रांती मोर्चा मशाल मार्च आज सायंकाळी 5 वजात मातोश्रीवर धडकणार आहे. मराठा आरक्षण लागू व्हावं, सुप्रीम कोर्टात ते टिकावं, यासाठी मराठा क्रांती मोर्चाने आज मशाल मार्चचं आयोजन केलं आहे. मात्र, मराठा क्रांती मोर्चा अजूनपर्यंत सर्व नियम पाळून, शांततेत झाला आहे. त्याप्रमाणेच आजचा मशाल मार्चही शांततेत काढण्यात येईल. मोर्चेकरी हे बांद्रा कलेक्टर कार्यालयाच्या समोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानात जमणार आहेत. मोर्चासाठी पूर्व तयारी म्हणून बैरिकेट्सची व्यवस्था करण्यात आली आहे (Maratha Kranti Mashal March For Maratha Reservation On Matoshree).
सुरक्षा व्यवस्थेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर वांद्रे, खेरवाडी येथे पीडब्ल्यूडी ग्राऊंडमध्ये वाहन पार्किंगची सोय करण्यात आली आहे. मोर्चेकरांच्यावतीने मातोश्रीवर मुख्यमंत्र्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.
मुंबईच्या कलानगर इथे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हा मशाल मार्च पोहोचणार आहे. त्यामुळे मातोश्रीवरील पोलीस सकाळपासूनच सतर्क झाले आहेत. मातोश्रीच्या गेट नंबर-2, मागच्या गेटजवळ पोलिसांनी बॅरिकेटिंग केली आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या इथे तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच, वरिष्ठ पोलिसांकडूनही गस्त घालण्याचं काम सातत्याने सुरु आहे.
अनेक मराठा नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने त्यांनाही मुंबई पोलिसांनी 144 च्या नोटीस पाठवल्या आहेत. वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आंबेडकर चौकात 250 राज्य राखीव पोलीसांची तैनाती काल रात्रीपासूनच करण्यात आली आहे. तिथे सात गाड्या आणि 250 पोलीस चौकात दाखल झाले आहेत.
मराठा क्रांती मशाल मोर्चाची नियमावली
मार्चमध्ये फक्त खालील घोषणा दिल्या जाणार
1) जय भवानी जय शिवराय
2) एक मराठा लाख मराठा
3) तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय
4) आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं.
मराठा क्रांती मशाल मार्चची नियमावली, शांततेत मोर्चा काढून मुख्यमंत्र्यांना निवेदन देणारhttps://t.co/mEGXBzqSFZ#MarathaReservation #MarathaKrantiMorcha #MashalMorcha
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 6, 2020
Maratha Kranti Mashal March For Maratha Reservation On Matoshree
संबंधित बातम्या :
मराठा आरक्षणावर तोडगा काढा, कोणतीही उणीव ठेवू नका; अशोक चव्हाणांची दिल्लीत वकिलांशी चर्चा
पंढरपूरमध्ये संचारबंदी आदेशाची होळी! राज्यभरात चक्काजाम आंदोलनाचा मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा