मुंबई – मुंबईला वेगवान बनवणाऱ्या कोस्टल रोडचे (Coastal Road) काम सध्या एकदम जोरात आहे. या मार्गातील दुसरा महाकाय बोगदा खोदण्यासाठी ‘मावळा’ बोअरिंग टनेल मशीन (Boring Tunnel Machine) निघाली आहे. बोगदा 2.072 किमीचा असून तो खोदण्याचं काम जोरात सुरु आहे. तसेच गिरगाव चौपाटी (Girgaum Chowpatty) ते प्रियदशर्नी पार्क इथंपर्यंत हा बोगदा आहे. डिसेंबर 2023 पर्यंत कोस्टल रोडचं काम पुर्ण होऊन मुंबईकरांच्या सेवेत येईल.
प्रकल्प उभारण्यासाठी 12 हजार 721 कोटी खर्च
मुंबई शहरात वाहतुकीची अधिक कोंडी होत आहे. वाहतूक कोडींला फोडण्यासाठी प्रियदर्शिनी पार्क ते वरळी सी-लिंकदरम्यान 10.58 किमीचा कोस्टल रोड बांधण्यात येत आहे. विशेष म्हणजे कोस्टल रोड हा पालिका उभारत असून त्यासाठी 12 हजार 721 कोटी खर्च आहे. या प्रकल्पात दोन महाकाय बोगदे बांधण्यात येणार आहेत. पालिकेने 2018 मध्ये कोस्टल रोडचे काम सुरू केले. तेव्हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी चार वर्षांची मुदत देण्यात आली होती. तसेच हा प्रकल्प नोव्हेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल असा अंदाज वर्तविला होता. मुंबई कोस्टल रोड प्रकल्प, मरीन ड्राइव्ह ते वांद्रे-वरळी सी-लिंकच्या वरळीच्या टोकापर्यंत एकूण 26 किमी लांबीचा असेल.
एका बोगद्याचे काम पुर्ण झाले आहे
एका बोगद्याचे काम पुर्ण झाले आहे. गेल्यावर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दुसऱ्या बोगद्याचे उद्धाटन करण्यात आले होते. वर्ष पुर्ण व्हायच्या आगोदर त्या बोगद्याचे काम पुर्ण झाले आहे. त्यानंतर आता दुसरा बोगदा खोदण्यास सुरूवात केली आहे. सध्याच्या स्थितीत प्रकल्पाचे काम पन्नास टक्के पुर्ण झाले आहे. 2023 डिसेंबरपर्यंत कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत येईल. असे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कोरोनाच्या काळात लॉकडाऊनचा फटका बसला
25 सप्टेंबर 2018 रोजी बीएमसीच्या स्थायी समितीने या प्रकल्पाला मान्यता दिली. त्यानंतर काम जवळजवळ लगेचच सुरू झाले. 2019 मध्ये न्यायालयाचा स्थगिती आल्यामुळे अनेक महिने बांधकाम ठप्प होते. तसेच कोरोनाच्या काळात लॉकडाऊनचा फटका बसला. त्यामुळे काम पुन्हा एकदा ठप्प झाले. मजुरांपासून ते यंत्रसामग्रीपर्यंत, ऑक्सिजन सिलिंडर, फॅब्रिकेशनसाठी, सर्वकाही मिळत नव्हतं.त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुन्हा प्रकल्पाचं काम सुरु झालं असं एका अधिकाऱ्याने सांगितलं.