मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी यंदाच्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव विचारता घेता ऑनलाइन भाऊबीज साजरी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईनच ओवाळा आणि ऑनलाईनच ओवाळणी द्या असं आवाहन करत भावा-बहिणींनी भाऊबीज घरातूनच ऑनलाईन पद्धतीने साजरी करावी, असं परिपत्रक मुंबई महानगरपालिकेने काढलं होतं. त्याच अनुषंगाने मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी यंदाच्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव विचारता घेता ऑनलाइन भाऊबीज साजरी केली. (Mayor Kishori Pednekar Celebrate online bhaubeej Diwali)
ऑगस्ट महिन्यात महापौर पेडणेकर यांच्या मोठ्या भावाचं कोरोनाने निधन झालंय. यंदाची दिवाळी आणि भाऊबीज त्यांच्यासाठी अतिशय भावनिक आहे. मात्र तरीही कौटुंबिक आघाताला बाजूला सारत मुंबईकरांची दिवाळी विनासायास व्हावी, यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.
मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी ऑनलाईन दिवाळी साजरी करताना कोरोनाच्या संकटात काम केलेल्या शिवसैनिक आणि कोव्हिड योद्धा अशा 21 भाऊरायांना ऑनलाइन ओवाळून ही भाऊबीज साजरी केली. भाऊबीज, पाडवा यावर्षी साधेपणाने साजरी करायचं आवाहन महापौरांनी केलं असताना त्यांनी स्वतः एकमेकांच्या घरी न जाता हा भाऊबीजेचा सणाचा उत्साह ऑनलाइन द्वारे द्विगुणित करत साजरा केला
यंदाच्या दिवाळीत आपल्या भावांशी ऑनलाइन संवाद साधला तसेच डॉक्टरांचे प्रतिनिधी म्हणून एका डॉक्टरांनासुद्धा भाऊबीजेनिमित्त ओवाळलं. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता आपण काही बंधने पाळायला हवीत, मुंबईकरांनी फटाके न फोडता महापालिकेच्या आवाहनाला मुंबईकरांनी उत्तम प्रतिसाद दिलाय आता भाऊ-बहिणींनी भाऊबीजही ऑनलाईन साजरी करावी, असं आवाहन त्यांनी केलं.
ऑगस्ट महिन्यात महापौर पेडणेकर यांच्या भावाचं निधन
महापौर किशोरी पेडणकेर यांचे मोठे भाऊ सुनील कदम यांचा कोरोनामुळे 1 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. ते 59 वर्षांचे होते. आठवडाभर मुंबईच्या नायर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, 1 ऑगस्ट रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.
(Mayor Kishori Pednekar Celebrate online bhaubeej Diwali)
संबंधित बातम्या
ऑनलाईनच ओवाळा, ऑनलाईनच ओवाळणी द्या; मुंबई पालिकेचे भावा-बहिणींना आवाहन
घेत होता भरारी उंच नभात, पण कुठेतरी आभाळ फाटलं, महापौर पेडणेकरांच्या भावाचं कोरोनाने निधन