मुंबई: भाजप नेते आशिष शेलार यांनी दिग्दर्शक करण जोहरच्या पार्टीत आघाडीतील मंत्री होता असा दावा केला होता. त्यावरून महापौर किशोरी पेडणेकर यांनी शेलारांवर जोरदार हल्ला चढवला. नुसता आरोप करू नका. पुरावे देऊन सिद्ध करा. नाही तर मुंबईकरांची माफी मागा, असं सांगतानाच आमदार, मंत्री झाला तरी तुमचा पालिकेत जीव कसा घुटमळतोय? आता जीव मोकळा कराच, असा खोचक टोला महापौर किशोरी पेडणेकर यांनी शेलारांना लगावला.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज त्यांच्या दालनात पत्रकार परिषद घेऊन आशिष शेलारांवर जोरदार हल्ला केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनावरून सर्वांना सातत्याने सतर्क राहण्यास सांगतात. महाराष्ट्र आणि कर्नाटकात सर्वाधिक कोरोना असल्याने महाराष्ट्रालाही सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, महाराष्ट्रातील भाजप नेते वेगळेच वागत असतात असं महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
बॉलिवूडच्या पार्टीत आघाडीचा मंत्री होता असा आरोप शेलार यांनी केला. कोण मंत्री त्या पार्टीत होता हे शेलारांनी स्पष्ट करावं. शेलार आणि इतर लोक बेछुट आरोप करून जनतेची दिशाभूल करत आहे. तुमची ही कार्यपद्धती सर्वांना कळली आहे. तुम्ही काय करता ते जनतेला कळलं आहे. शेलारांना सांगायचं आमदार झाला, मंत्री झाला पण जीव मात्र अजूनही महापालिकेत घुटमळत आहे. कशासाठी? जर तुमचा जीव घुटमळत आहे. त्या जीवाला मोकळं करायचं असेल तर पुरावे देऊन आरोप सिद्ध करा. उगाच आरोप करू नका. लोकशाहीने अधिकार दिला म्हणून कसाही आरोप कराल हे चालणार नाही. संविधानाने दिलेल्या अधिकाराचा अपमान करू नका. तुमच्याकडे पुरावे असेल तर दाखवा. कोण तरी होता कोण होते. याचा पुराव्यासहीत खुलासा करावा, असं आव्हान महापौरांनी केलं.
तुमचे नगरसेवक स्थायी समितीत बसतात. त्यावेळी ते काय करतात? त्या क्षणाला विरोध का करत नाही. ते अकार्यक्षम आहे का? त्यांच्यावर तुमचा विश्वास नाही का? तुमचे 83 नगरसेवक अकार्यक्षम आणि तुम्हीच हुशार का?, असे सवाल करतानाच हवेत घोटाळ्याचे आरोप करू नका. स्वत: घोटाळे करता आणि दुसऱ्यावर आरोप करता हे आता बंद करा, असंही त्या म्हणाल्या.
सत्ता सर्वांनाच हवी असते. पण तुम्हाला तर हवीच हवी आहे. त्यामुळे तुम्ही कसेही हवी होत आहात. तुम्ही माझ्यावर शिंतोडे उडवले. मी ते बघेनच. मी नुसती बघणार नाही आमचा पक्ष, महिला आघाडी आणि सरकार बघून घेईल. तुमच्या घाणेरड्या पत्रव्यवहारांनी घाणेरड्या आरोपांनी खचून जाणारी किशोरी पेडणेकर नाही. शिवसेनेच्या रणरागिनी आहोत आम्ही. आता चॅलेंज आहे. तुम्ही जी एक पुडी सोडली आहे, आघाडीच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचं काम तुम्ही केलं आहे. नक्की कोण आणि त्याचे पुरावे द्या. घोटाळ्याचे नुसते आरोप करू नका. नक्की कोण होता याचा उलगडा कराच नाही तर जनतेची माफी मागा. नुसतं बोलू नका शेलारांना आव्हान आहे, असंही त्या म्हणाल्या.
संबंधित बातम्या:
VIDEO: हे ट ला ट, फ ला फ, झ ला झ आम्हालाही लावता येतं, मोदींच्या प्रश्नावर राऊत का भडकले?