मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut Case) अनधिकृत बांधकामाबाबत (Mayor Kishori Pednekar Slams BJP) मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. यावेळी या सुनावणीसाठी महानगरपालिकेने वकिलांना सुमारे 82 लाख 50 हजार रुपये फी दिली आहे. याबाबत मुंबई महानगर पालिकेवर भाजपकडून टीका केली जात आहे. तर भाजपची ही डबल ढोलकी सारखी भूमिका असल्याचा टोला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी लगावला आहे (Mayor Kishori Pednekar Slams BJP).
भाजपला डबल ढोलकी वाजवायला आवडते वाटतं?, ज्या कंगनानं महाराष्ट्र, मुंबईला वेठीस धरुन पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तिला त्यांनी पाठिशी घातले. पैसे खर्च केले नसते तर मग ती जे आरोप करतेय ते मान्य करायला लागले असते. हे भाजपचे फक्त प्रश्न विचारणारे राहिलेत, असं म्हणत त्यांनी भाजपला सडेतोड उत्तर दिलं आहे.
या प्रकरणावरुन भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सरकारवर टीका केली. “पेंग्विन आणि कंगना रनौतच्या प्रकरणातील वकीलासाठी मुंबईकर कर भरतात. आणखी काय शिल्लक आहे? आता असं वाटतंय की यांच्या मुलांची लग्नही आपल्याच पैशातून होतील,” असा टोलाही नितेश राणे यांनी लगावला आहे. नितेश राणे यांनी ट्विट करत ही टीका केली आहे.
Wow! Mumbaikers pay tax for..
1.)Penguins
2.)lawyers for Kanganas caseWhat else is left???
Inke baccho ki shaadi abhi humare hi paiso se hogi lagta hai!!
— nitesh rane (@NiteshNRane) October 28, 2020
अभिनेत्री कंगना रानौतने वांद्रे पाली हिल येथील आपल्या घरात माणिकर्णिका फिल्म्सचे कार्यालय सुरु केले होते. या कार्यालयात कंगनाने बेकायदेशीर बांधकाम केले होते. याच दरम्यान कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. त्याचे मुंबईत याचे पडसाद उमटले होते. मुंबई महापालिकेने कंगनाला बेकायदेशीर बांधकाम केल्या प्रकरणी 354 कलमान्वये नोटीस दिली होती. या नोटीसीला योग्य उत्तर दिले नसल्याने पालिकेने कंगनाच्या मणिकर्णिका फिल्म्स या कार्यालयातील बेकायदेशीर बांधकाम तोडले होते (Mayor Kishori Pednekar Slams BJP).
कंगनाच्या कार्यालयातील बेकायदेशीर बांधकाम तोडले जात असताना कंगणाच्या वकिलाने आपण उच्च न्यायालयात दाद मागितली असल्याचे निदर्शनास आणल्यावर तोडकाम थांबण्यात आले होते. कंगणाच्या बेकायदेशीर काम तोडण्यास उच्च न्यायालयाने स्टे दिला आहे. या प्रकरणी मुंबई महापालिकेने कोणत्या वकिलाची नियुक्ती केली आणि त्यांना किती रक्कम अदा करण्यात आल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शरद यादव यांनी मागितली होती.
याबाबत माहिती देताना या प्रकरणी पालिकेची उच्च न्यायालयात मांडण्यासाठी अस्पि चिनॉय यांची वकील म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांना पालिकेने 22 सप्टेंबर रोजी 3 वेळा 7 लाख 50 हजार तर 7 ऑक्टोबर 8 वेळा 7 लाख 50 हजार रुपये असे एकूण 82 लाख 50 हजार रुपये फी म्हणून अदा केले आहेत अशी माहिती पालिकेच्या कायदा विभागाने दिली आहे.
…तर यांच्या मुलांची लग्नही आपल्याच पैशातून होतील, नितेश राणेंची टीकाhttps://t.co/1FCjmBNiKl #BMC #Mumbai #UddhavThackeray #NiteshRane @NiteshNRane @ShivSena @uddhavthackeray
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 28, 2020
Mayor Kishori Pednekar Slams BJP
संबंधित बातम्या :
Kangana Ranaut | कंगना रनौत विरुद्धच्या खटल्यासाठी मुंबई महापालिकेकडून 82 लाखांचा खर्च
Kangana Ranaut | पोलिसांच्या समन्सनंतर कंगना रनौतची ‘टीवटीव’, पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारवर टीका!