सिंगल विटांच्या भिंतींवर तीन मजली बांधकाम, म्हाडाच्या ठेकेदारांचा प्रताप

| Updated on: Jul 05, 2019 | 4:47 PM

मुंबई : तीन मजली इमारतीचे बांधकाम सुरु असताना स्लॅब कोसळून तीन मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथे घडली. या घटनेमागे म्हाडा वसाहतीचे बांधकाम ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप तेथील स्थानिकांनी केला आहे. या इमारतीचे स्लॅब कोसळल्याचे धक्कादायक कारण आता समोर आलं आहे. ही इमारत अनधिकृतपणे उभारली जात होती. या इमारतीच्या चुकीच्या बांधकामामुळे हा […]

सिंगल विटांच्या भिंतींवर तीन मजली बांधकाम, म्हाडाच्या ठेकेदारांचा प्रताप
Mhada
Follow us on

मुंबई : तीन मजली इमारतीचे बांधकाम सुरु असताना स्लॅब कोसळून तीन मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथे घडली. या घटनेमागे म्हाडा वसाहतीचे बांधकाम ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप तेथील स्थानिकांनी केला आहे. या इमारतीचे स्लॅब कोसळल्याचे धक्कादायक कारण आता समोर आलं आहे. ही इमारत अनधिकृतपणे उभारली जात होती. या इमारतीच्या चुकीच्या बांधकामामुळे हा स्लॅब कोसळला आणि त्या तीन मजुरांना आपला जीव गमवावा लागला.

म्हाडा वसाहतीचे बांधकाम ठेकेदार एक अजब प्रकारची बांधकाम पद्धती वापरतात. यामध्ये सिंगल विटांच्या भिंतींवर तीन मजले उभे केले जातात. एका बैठ्या घरावर तब्बल तीन मजले बांधले जातात, यासाठी कुठल्याही प्रकारची परवानगी घेतली जात नाही. हे सर्व काम ठेकेदारांच्या मनमर्जीने चालतं. हे तीन मजले केवळ एका आय बीमवर असतात. म्हणजेच सिंगल विटेचं तीन मजली बांधकाम.

हे बांधकाम मजबूत नसल्याने ते कधीही कोसळू शकतं आणि अशाच एका बांधकामाचे ते मजूर बळी ठरले. ही काही एक इमारत नाही तर मुंबईत म्हाडाच्या अशा अनेक इमारती उभ्या आहेत, मात्र याबाबत जबाबदार अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमतामुळे हा कारभार असाच सुरु आहे. नागरिकांनी अनेकदा यासंबंधी तक्रारी केल्या. मात्र स्वत: अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमतामुळे कुठलीही कारवाई झाली नाही.

अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात संगनमत असल्याचं खुद्द म्हाडाच्या मुंबई बोर्डाच्या अध्यक्षांनी मान्य करत अशा सर्व बांधकामांवर आणि सर्व ठेकेदारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.