मुंबई: हक्काच्या घरासाठी वाट पाहणाऱ्या मुंबईकरांना अखेर म्हाडाने खुशखबर दिली आहे. यंदा म्हाडाच्या 1382 घरांसाठी लॉटरीची तारीख जाहीर झाली आहे. 16 डिसेंबरला लॉटरीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यासाठी 5 नोव्हेंबरपासून 10 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे यंदा अल्प उत्पन्न गटातील घरांची संख्या सर्वाधिक आहे. सर्वात कमी किमतीचं घरं 14.61 लाखात उपलब्ध आहे, तर उच्च उत्पन्न गटातील सर्वात महाग घराची किंमत 5 कोटी 80 लाख रुपये इतकी आहे. महागडं घर हे दक्षिण मुंबईतील ग्रांट रोड परिसरात आहे.
म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत आणि मुंबई म्हाडाचे अध्यक्ष मधू चव्हाण यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेत म्हाडाच्या लॉटरीची तारीख जाहीर केली. दिवाळीपूर्वी आम्ही लॅाटरी जाहीर करुन दिलेला शब्द पाळला, असं यावेळी दोन्ही अध्यक्षांनी सांगितलं.
म्हाडाच्या lottery.MHADA.gov.in. या वेबसाईटवर लॉग इन करुन तुम्हाला म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करता येणार आहेत.
कोणत्या उत्पन्न गटात किती घरं?
अत्यल्प उप्पन्न गट – 63 घरं
अल्प उत्पन्न गट – 926 घरं
मध्यम उपन्न गट – 201 घरं
उच्च उपन्न गट – 194 घरं
5 कोटी 80 लाखाचं सर्वात महाग घर ग्रांट रोडला
सर्वात कमी किंमतीचं घर 14.61 लाखात चांदविली
16 डिसेंबरला लॉटरी निघणार
5 नोव्हेंबरपासून लॉटरीच्या नोंदणीला सुरुवात
अर्ज करण्यासाठी 10 डिसेंबर अंतिम मुदत.