मुंबई : म्हाडाची मुंबईची लॉटरी (MHADA lottery Mumbai) उद्या गुरुवारी 11 फेब्रुवारीला दुपारी जाहीर होणार आहे. बीडीडी चाळीतील रहिवाश्यांसाठी ही लॉटरी सोडत आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी याबाबतची माहिती दिली. मुंबईतील ना. म. जोशी मार्गावरील 300 घरांची लॉटरी निघणार आहे. दुपारी 12.30 वाजता ही लॉटरी निघेल, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.
विरार येथील पोलिसांच्या घरांची लॉटरी आज काढण्यात आली. कोणी शिरढोण इथे घराचीही लॉटरी काढणार आहोत. ज्या पोलिसांना घरं हवी आहेत त्यांनी कोकण म्हाडाशी संपर्क साधावा. पोलीस, चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांना घरं उपलब्ध करून देणार, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.
कोळीवाड्यात SRA योजना नाही
दरम्यान, कोळीवाडे ही गावठाणे आहेत. गरजेनुसार पूर्व परंपरेने ही घरं बांधली आहेत. जरी ही बैठी घरं असली तरी तिथे SRA योजना लागू होणार नाही. कोळीवाड्यांना FSI देऊन त्यांचा विकास व्हावा असा प्रयत्न आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
दरम्यान लवकरच म्हाडा कोकण मंडळात अर्थात ठाणे, कल्याण परिसरात तब्बल 7500 घरांसाठी लॉटरी जाहीर करणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये म्हाडा ही लॉटरी जाहीर करणार आहे.
म्हाडाची घरं ठाण्यात भंडारली आणि गोटेघर इथं आहेत. तिकडे कल्याणमध्ये शिरडोने कोणी इथल्या घरांसाठी लॉटरी काढण्यात येईल. ही लॉटरीची प्रक्रिया मार्चमध्ये सुरु होणं अपेक्षित आहे. ही सोडत मे मध्ये जाहीर होऊ शकते.
म्हाडा अर्थात ‘महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण’ (Maharashtra Housing and Area Development Authority) ही महाराष्ट्र सरकारची एक योजना आहे. सरकार या अंतर्गत वेगवेगळ्या समाज घटकांसाठी घरं बांधते. म्हाडा अंतर्गत आतापर्यंत राज्यात लाखो घरं बांधून झाली आहेत. (MHADA Chairman to be changed)
संबंधित बातम्या
मुंबईतही म्हाडाची लॉटरी निघणार – गृहनिर्माण मंत्री आव्हाडांची घोषणा