MHADA Lottery 2022 : मुंबईत घर घेण्याचं अनेकाचं स्पप्न पूर्ण होणार आहे. यंदाची दिवळी ही अनेकांसाठी हक्काचं घर घेऊन येणार आहे.
अंबरनाथच्या म्हाडा टाऊनशीपला मनसेचा विरोध
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on
मुंबई : म्हाडाकडून मुंबईकरांना मोठं दिवाळी (mhada lottery 2022) गिफ्ट मिळणार आहे. दिवाळीत म्हाडच्या (Mhada Lottery) तब्बल 3 हजार घरांची सोडत निघणार आहे. जितेंद्र आव्हाड (mhada lottery 2022 mumbai) यांनी आजच ट्विटरवरून ही घोषणा केली आहे. त्यामुळे मुंबईत घर घेण्याचं अनेकाचं स्पप्न पूर्ण होणार आहे. यंदाची दिवळी ही अनेकांसाठी हक्काचं घर घेऊन येणार आहे. पहाडी गोरेगाव,मुंबई येथील म्हाडा प्रकल्पाला भेट देऊन प्रगतीपथावर असलेल्या कामाची पाहणी केली लवकरच हे काम पुर्ण होऊन या सदनिका नागरिकांना वाटपासाठी खुल्या होतील यावेळी म्हाडाचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. दिवाळीत 3000 घरांची सोडत निघेल, असे ट्विट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. त्यामुळे आता अनेकजण या घरांच्या तयारीला लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच म्हाडाने उत्पादन मर्यादाही वाढवली आहे. त्यामुळे यावेळी जास्त पैसे भरण्याची तयारी मात्र ठेवावी लागणार आहे.
जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट
पहाडी गोरेगाव,मुंबई येथील म्हाडा प्रकल्पाला भेट देऊन प्रगतीपथावर असलेल्या कामाची पाहणी केली लवकरच हे काम पुर्ण होऊन या सदनिका नागरिकांना वाटपासाठी खुल्या होतील यावेळी म्हाडाचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
दिवाळीत 3000 घरांची सोडत निघेल #विकास_गतिमान_विभाग_गृहनिर्माणpic.twitter.com/JzbzPV8u3L
जितेंद्र आव्हड यांची ही मोठी घोषणा म्हणजे म्हडाचं घर घेऊ पाहणाऱ्या अनेकांसाठी आनंदवार्ता आहे. अनेकजण आता पैशांची जुळजुळव करण्याचा तयारीली लागताना दिसत आहेत. कारण मुंबईत घरं घेणं आत्ता सोप राहिलेलं नाही. यंदाची दिवाळी ही अनेकांसाठी हक्काचं घर घेऊन असणारी आहे, त्यामुळे अनेकांना मुंबईत घर घेण्याचं आपलं स्पप्न पूर्ण करता येणार आहे.
मुंबईत घरं घेण्यासाठी अनेकजण आपली आयुष्यभराची कमाई पणाला लावतात. अशा लोकांना योग्य किंमतीत परवडणारी, स्वस्त घरं मिळावी यासाठी म्हडासारख्या संस्था कार्यरत आहेत. या संस्था अनेकांचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करतात, मात्र अलिकडेच वाढवली उत्पन्न मर्यादा काहीशी चिंता वाढवणार आहे. त्यावरही एकदा नजर टाकूया…
नव्या घरांसाठी किती उत्पन्न मर्यादा?
अत्यल्प गट – वार्षिक 6,00,000 रुपये
अल्प गट – वार्षिक 6,00,001 ते 9,00,00 रुपये
मध्यम गट – वार्षिक 9,00,001 ते 12,00,000 रुपये
उच्च गट – वार्षिक 12,00,001 ते 18,00,000 रुपये
जुनी उत्पन्न मर्यादा किती होती?
अत्यल्प गट – प्रतिमाह 25, 000 रुपयांपर्यंत
अल्प गट – प्रतिमाह 25,000 ते 50,000 रुपयांपर्यंत
मध्यम गट – प्रतिमाह 50,001 ते 75000 रुपयांपर्यंत
उच्च गट – प्रतिमाह 75,001 रुपयांच्या पुढे
पाहा व्हिडीओ :
आता दिवाळीत निघणाऱ्या म्हाडा लॉटरीची सर्वसामान्यांना प्रतिक्षा आहे.