मुंबई | 14 जानेवारी 2024 : मुंबईत काँग्रेसला मिलिंद देवरा यांनी अखेरचा दंडवत घातला. त्यांच्या राजीनाम्याने अर्थात केवळ काँग्रेसमध्येच नाही तर इंडिया आघाडीतही खळबळ झाली आहे. मिलिंद देवरा काँग्रेस सोडणार ही अनेक दिवसांपासूनची चर्चा होती. अखेर त्यांनी आज समाज माध्यमातून काँग्रसेला धक्का दिला. राहुल गांधी यांची इंफाळ येथून भारत जोडो न्याय यात्रा आजपासून सुरु होत आहे. नेमका हाच मुहूर्त मिलिंद देवरा यांनी गाठला. त्यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसची प्रतिक्रिया आली आहे. मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी हा निर्णय दुर्दैवी असल्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
काय आली प्रतिक्रिया
मिलिंद देवरा यांनी घेतलेला हा निर्णय अत्यंत दुर्देवी आहे. मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी काँग्रेस कार्यकर्ता म्हणून हा निर्णय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया नोंदवली. काँग्रेस परिवारासोबत देवरा कुटुंबिय हे अनेक वर्षांपासून निष्ठेने जोडल्या गेलेले होते. हे पाऊल टाकू नये यासाठी आम्ही सर्वांनी शर्थीने प्रयत्न केले. पक्ष नेतृत्वाने पण तुमची मनधरणी केली. पक्ष एक इतिहास रचत असताना तुम्ही पक्ष सोडण्याचे जाहीर केले. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. देवरा यांनी या निर्णयाचा फेरविचार करण्याचे आवाहन वर्षा गायकवाड यांनी केले.
It is unfortunate that you have taken this decision, @milinddeora ji. On a personal level and as a Congress karyakarta, I feel sad today.
The Deora family has had a long & storied association with the Congress Parivar. All of us were trying to convince you against taking this… https://t.co/xOooqkrdmZ
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) January 14, 2024
हा तर दोनदा पराभूत उमेदवार
आजपासून सुरु होणाऱ्या राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला भाजप आणि त्यांचे सहकारी पक्ष घाबरले आहेत. त्यामुळेच यात्रेपासून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी ED, CBI, IT यासारख्या केंद्रीय संस्थांची भिती दाखवून आमच्या काही सहकाऱ्यांना आपल्यासोबत घेत असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. काँग्रेस फुटणार अशा आवया उठवणारे भाजप आणि त्यांचे फुटीर सहकारी दोनवेळा पराभूत झालेल्या उमेदवाराला सोबत घेऊन भारत जोडो न्याय यात्रेच्या शुभारंभावरून दुसरीकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न करतायेत. पण तो यशस्वी होणार नाही. या यात्रेची समाप्ती मुंबईतच होणार असून यात्रेच्या समाप्ती सोबतच असंवैधानिक भाजप, शिंदे, अजित पवार सरकारचाही शेवटही होणार आहे.
का सोडली काँग्रेस
मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सोडण्यामागे इंडिया आघाडी कारणीभूत असल्याचा तर्क देण्यात येत आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास ते इच्छुक आहेत. पण या जागेवर उद्धव ठाकरे गटाचा दावा आहे. त्यामुळे देवरा यांना संधी नव्हती. त्यामुळेच त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. त्यांना गेल्या दोन निवडणूकीत पराभावाचा सामना करावा लागला आहे.
मिलिंद देवरा होते अस्वस्थ
इंडिया आघाडीत सध्या जागा वाटपावरुन चर्चा सुरु आहे. अरविंद सावंत हे दक्षिण मुंबई मतदार संघातून दोनदा निवडून आले होते. त्यांनी मिलिंद देवरा यांचा पराभव केला होता. आता ही जागे उद्धव ठाकरे गट सोडण्याच्या मनस्थितीत नव्हता. तर देवरा यांना दक्षिण मुंबईतूनच लोकसभा लढवायची असल्याचे स्पष्ट झाले होते. ठाकरे गटाने महाविकास आघाडीतील काँग्रेसला ही जागा सोडण्यास नकार दिला. कोणत्याही परिस्थितीत प्रतिष्ठेची जागा इतर कोणत्याही पक्षाला न सोडण्याचा निर्धार सावंत यांनी शनिवारी बोलून दाखवला होता. त्यामुळे देवरा अस्वस्थ होते.