जळगावः राज्यात आज अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे राजकीय नेत्यांनीही आपापल्या पक्षासाठी जोरदार फिल्डिंग लावून ग्रामपंचायतीवर आपलाच झेंडा फडकवण्यासाठी कंबर कसली होती. ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालाविषयी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी भाजप आणि शिंदे गटाला 70 ते 75 टक्के ग्रामपंचायतींवर भाजपचाच झेंडा फडकणार असून काँग्रेस-राष्ट्रवादी पक्ष नावालाही राहणार नाही असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.
राज्यातील अनेक ग्रामपंचायतींसाठी आज मोठ्या चुरशीने निवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे झालेल्या निवडणुकांवर भाजपचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी राज्यात ज्या ज्या ठिकाणी ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत्या. त्यापैकी बहुतांशी ग्रामपंचायतींवर भाजपचेच उमेदवार विजयी होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी त्यानी जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायतींबाबत बोलताना सांगितले की, जळगाव जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायतींवर भाजपची सत्ता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
तर राज्यातही हीच परिस्थिती असणार असल्याचा विश्वास गिरीश महाजन यांनी विश्वास व्यक्त करून दाखवला आहे. त्यामुळे आता राज्यातील ग्रामपंचायतींच्या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
राज्यातील अनेक ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास व्यक्त करत असताना त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचा पक्षाला त्यांनी राजकीय स्पर्धेत धरले नाही. काँग्रेस राष्ट्रवादीविषयी बोलताना त्यांनी हे दोन्ही पक्ष कुठे नावालाही उरणार नाहीत असं त्यांनी सांगितले आहे.
मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपविषयी व्यक्त केलेला विश्वास आता कितपत बरोबर ठरतो ते आता निकालादिवशीच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत किती यश मिळवते ते आता येणारा काळच ठरवणार आहे.