मुंबईः ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा गंभारी आरोप केला आहे. त्यावरून राज्यातील राजकारण प्रचंड तापले आहे. त्यावरून आता शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी बोलताना सांगितले की, डॉ. खासदार श्रीकांत शिंदे यांना बदनाम करण्यासाठी हे वक्तव्य केलेलं असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांनी जरी गंभीर आरोप केला असला तरी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर आता लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.
संजय राऊत यांच्या आरोपाबद्दल शिंदे आणि ठाकरे गटातील नेत्यांनी मतं व्यक्त केली असून संजय राऊत यांच्या विरोधकांनी त्यांच्या तक्रारीला गंभीरपणे घेतले नाही.
त्याचमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच सांगितलेला आहे की संजय राऊत यांच्या वक्तव्याला गांभीर्याने घेऊ नये असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर खासदार संजय राऊत यांची मुख्यमंत्र्याएवढीच असलेली सुरक्षा काढून घेण्यात आली होती.
त्यामुळे त्यांनी आपली सुरक्षा व्यवस्था वाढवून घेण्यासाठी असा प्रकार केला असल्याचा टोलाही शंभूराज देसाई यांनी त्यांना लगावला आहे.
आपली सुरक्षा व्यवस्था काढून घेतली असल्यामुळे त्यांना स्वतःची सुरक्षा वाढवून घेण्यासाठीच अशाप्रकारे मोठ्या व्यक्तींची नावं घ्यायची आणि सुरक्षा व्यवस्था वाढते त्यासाठी हे विधान केलेले आहे असंही त्यांनी म्हटले आहे.
खासदार संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करुन. त्यांनी स्वतःला नाहक महत्त्व प्राप्त करून देण्यासाठी संजय राऊत यांनी प्रयत्न केला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मात्र संजय राऊत यांच्या आरोपामध्ये कोणतेही तथ्य नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री सुपुत्र आणि खासदार असलेल्या श्रीकांत शिंदे यांच्यावर खासदार संजय राऊत यांनी गंभार आरोप केले आहेत. त्यामुळे त्यांनी हे आरोप केल्यामुळे संजय राऊत यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असाही त्यांनी इशारा दिला आहे.
तर काल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते. त्याबद्दल बोलताना शंभूराज देसाई म्हणाले की, त्यांनी जे आरोप केले आहेत. त्याची माहिती त्यांनी मला द्यावे त्याची चौकशी मी करेन असा शब्दही त्यांनी यावेळी दिला.
जितेंद्र आव्हाड यांनी ज्या प्रकारे आरोप केले आहेत. मात्र महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था आहे. सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन कामासाठी नागरी सुविधांचे काम महापालिकांमध्ये केली जातात असंही त्यांनी यावेळी सांगितले.
त्यामुळे गुंडगिरीसारखे गंभीर आरोप केले असले तरी अशाप्रकारे कोणत्याही गुंडांचा वापर महानगरपालिका प्रशासकीय विभागात आढळून आलेला नाही असंही पालकमंत्री म्हणून शंभूराज देसाई यांनी सांगितले.