काँग्रेसचं तिकीट घ्यायला कुणी तयार नाही; भाजप नेत्यानं काँग्रेसची चिंता सांगितली…

| Updated on: Jan 13, 2023 | 5:57 PM

भविष्यासाठी भाजपकडून आपल्या पक्षात चांगली लोकं येण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. विविध क्षेत्रा भाजपचे काम चालू व्हावे, आपला देश जगाचा विश्वगुरु व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

काँग्रेसचं तिकीट घ्यायला कुणी तयार नाही; भाजप नेत्यानं काँग्रेसची चिंता सांगितली...
Follow us on

मुंबईः पदवीधर मतदार संघाच्या राजकारणामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भाजप विरुद्ध काँग्रेसची लढाई दिसून आली. सत्यजित तांबे यांच्या राजकीय भूमिकेमुळे भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) पुन्हा एकदा समोरासमोर आले आहेत. पदवीधर मतदार संघाच्या राजकीय घडामोडीबाबत बोलतान भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधत काँग्रेसने आता चिंतन करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.

याविषयी बोलताना ते म्हणाले की पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीवरून आता सगळ्यांच्या लक्षात आले आहे की, काँग्रेसचे तिकीट घ्यायला आता कुणी तयार नाही.

त्यामुळे भाजपने आत्मचिंतन करण्याची गरज नाही तर काँग्रेस पक्षाने पक्ष संघटन, नेतृत्त्व आणि कार्यशैली सुधारणा करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

राज्यात आणि राज्याबाहेर होणाऱ्या निवडणुकांविषयी बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, राजकीय समीकरणं बदलत आहेत. त्याचबरोबर आताच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून कोणीही तिकीट घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे काँग्रेसनेच आता पक्षाच्या ध्येयधोरणाविषयी विचार करावा असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

काँग्रेस पक्षाने आपल्यामध्ये सुधारणा केली पाहिजे, आपल्या पक्ष नेतृत्वासाठी आणि पक्ष संघटनेसाठी काम करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. काँग्रेसपेक्षा वेगळ्या धर्तीवर भाजपकडून वेळोवेळी प्रयत्न केले जात आहेत.

त्यामुळेच भविष्यासाठी भाजपकडून आपल्या पक्षात चांगली लोकं येण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. विविध क्षेत्रा भाजपचे काम चालू व्हावे, आपला देश जगाचा विश्वगुरु व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

त्यामुळे भारतामध्ये चांगल्या लोकांना एकत्र करून तो संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या विरोधात काँग्रेसचे काम सुरू आहे. त्यामुळे काँग्रेसच्या तिकिटावरही कुणी लढायला तयार नाही असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल चढविला आहे.

पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीपासून काँग्रेसच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून कोणीही तिकिट घेण्यास तयार नसल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. त्यामुळे काँग्रेसने इतर पक्षावर आणि भाजपवर टीका करण्यापेक्षा त्यांनी आपला पक्ष सुधारावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.