मिरा-भाईंदरमध्ये अल्पवयीन मुलीसह तिघांना कोरोना, आकडा 117 वर

| Updated on: Apr 24, 2020 | 9:22 AM

मिरा-भाईंदरमध्ये आणखी तीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये एका अल्पवयीन मुलीसह दोघांचा समावेश आहे.

मिरा-भाईंदरमध्ये अल्पवयीन मुलीसह तिघांना कोरोना, आकडा 117 वर
Follow us on

मुंबई : राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या ही दिवसागणिक (Mira-Bhayandar New Corona Patients ) वाढत चालली आहे. सध्या राज्यात 6 हजार 427 कोरोनाचे रुग्ण आहेत. तर 283 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील सर्वाधिक कोरोनारुग्ण हे मुंबईत आहेत आणि हा आकडा रोज वाढत आहे. मिरा-भाईंदरमध्ये आणखी तीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये एका अल्पवयीन मुलीसह दोघांचा समावेश आहे. त्यामुळे मिरा-भाईंदरमध्ये कोरोना रुग्णांच्या (Mira-Bhayandar New Corona Patients ) संख्येने शंभरी पार केली आहे.

मिरा-भाईंदर कोरोनाचे 3 रुग्ण वाढले आहेत. एका 10 वर्षीय अल्पवयीन मुलीसह 19 वर्षीय मुलगा आणि 55 वर्षीय वृद्ध महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. मिरा-भाईंदरमध्ये रुग्णांचा आकडा 117 वर पोहचला आहे, तर आतापर्यंत 15 रुग्ण बरे झाले आहेत. मिरा-भाईंदरमध्ये दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर 100 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.

मिरा-भाईंदरमध्ये 117 कोरोना रुग्ण 

मिरा-भाईंदर शहरात आतापर्यंत 1,405 जणांची स्वॅब टेस्ट करण्यात आली आहे. यापैकी 117 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर 436 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 383 जणांना 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आलं आहे. तर, 1,022 जणांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. तसेच, 621 जणांना होम क्वारंटाईन (Mira-Bhayandar New Corona Patients ), 281 जणांना क्वारंटाईन तर 103 जणांना आईसोलेशन मध्ये ठेवण्यात आलं आहे.

28 एप्रिलपर्यंत औषधांची दुकानं सोडून सर्व दुकानं संपूर्णतः बंद

मिरा-भाईंदरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे औषधांची दुकानं सोडून सर्व दुकानं संपूर्णतः बंद करण्यात आली आहेत. हा बंद 28 एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत असणार आहे. मिरा-भाईंदर मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग पाहून हे निर्देश दिले.

दुधाच्या दुकानांना सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत सूट देण्यात आली आहे. तसेच, अत्यावश्यक वस्तूंची घरपोच सेवा सकाळी 9 ते संध्याकाळ 5 वाजेपर्यंत सुरु राहील. यापूर्वी आयुक्तांनी औषधांची दुकानं सोडून इतर सर्व दुकानं 19 एप्रिलपासून ते 23 एप्रिल मध्यरात्रीपर्यंत संपूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.

मिरा-भाईंदर कोरोनाचं नवं हॉटस्पॉट?

मिरा भाईंदर शहरात कोरोना रुग्णांचा आकडा हा 117 वर गेला आहे. तरीही बेजबाबदार नागरिक विनाकारण बाहेर पडताना दिसत आहेत. मिरा-भाईंदर (Mira-Bhayandar New Corona Patients ) शहर आता कोरोनाच्या हॉटस्पॉटच्या मार्गावर आहे.

संबंधित बातम्या :

मुंबईहून पुण्याला परतलेल्या 4 सीआरपीएफ जवानांना कोरोना, 96 जवान क्वारंटाईन

पुण्यात एका दिवसात ‘कोरोना’चे 104 नवे रुग्ण, चार वॉर्डमध्ये शंभरीपार, कोणत्या प्रभागात किती?

केंद्रीय पथकांच्या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करा, उद्धव ठाकरेंचे प्रशासनाला आदेश

राज्यात तब्बल 778 नवे रुग्ण, महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 6427 वर