मुंबई : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी गोरेगावमधून झालेल्या सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर करप्ट सीएम म्हणत त्यांनी त्यांच्यावर तोफ डागली आहे. आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेतील घोटाळ्यावरून सत्ताधारी शिवसेना पक्षावर जोरदार हल्लाबोल करत मुंबई महानगरपालिकेतील रस्त्याच्या घोटाळ्यावरून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराबद्दल बोलताना त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर घोटाळ्याचा आरोप करत मुंबईकरांचे पैसे वाया घालत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
मुंबई महानगरपालिकेच्या शाळांसाठी ज्या दिवशी प्रवेशासाठी लोकं आपल्याकडे येतील त्यादिवशी आमच्या कामाचं सार्थक झाल्यासारखं वाटेल असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
हे शिंदे-फडणवीस सरकार मुंबईकरांना लुटण्याचा प्रयत्न शिंदे-फडणवीस सरकार केल्याचा आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.
यावेळी त्यांनी हिंदुत्वाच्या प्रश्नावरूनही शिंदे-फडणवीस सरकार त्यांनी टीका केली, आमचे हिंदुत्व, तुमच्या हिंदुत्वापेक्षा वेगळे आहे. आमचे हिंदुत्व सर्वांना सोबत घेऊन जाणारे आहे असंही त्यांनी सांगितले.
महाविकसा आघाडीचे सरकार असताना मुंबईचे पाच मंत्री होते. त्यामुळे मुंबईसाठी जे करता येईल त्यासाठी कोणतीही तडजोड आम्ही केली नाही.
मात्र आताच्या मंत्रिमंडळात एकही महिलान नाही, एकही मुंबईचा मंत्री नाही त्यामुळे मुंबईसासाठी कसे काम करणार असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांचा पैसा, आणि मुंबईकरांना महानगरपालिकेकडून मिळत असलेल्या सोयींबद्दल सवाल उपस्थित करत हे सरकार मुंबईकरांवर अन्याय करत असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आणि राज्य सरकारवर टीका करताना त्यांनी या सरकारवरही जोरदार हल्लाबोल केला. एकनाथ शिंदे यांच्यावर बोलताना मुख्यमंत्री कार्यालय हे दिल्लीवरुन चालतं अशी टीकाही त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केली.