“हा आवाज बहुजनांचा, त्यामुळे हेच नेमकं भाजपचं दुखणं”; राष्ट्रवादीच्या नेत्यानं बेताल वक्तव्यामागचं राजकारण सांगितलं

| Updated on: Feb 05, 2023 | 7:11 PM

औरंगजेबला ज्या संपवण्यात आले, त्यानंतर शिवाजी महाराज यांनी दुप्पट केले शिवाजी महाराज यांनी मिळवले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपली माता जिजामाता यांचा आदेश कधी डावलला नाही.

हा आवाज बहुजनांचा, त्यामुळे हेच नेमकं भाजपचं दुखणं; राष्ट्रवादीच्या नेत्यानं बेताल वक्तव्यामागचं राजकारण सांगितलं
Follow us on

ठाणेः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, चंद्रकांत पाटील, संजय गायकवाड, चित्रा वाघ यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य केली होती. तर काही नेत्यांकडून इतिहासाची मोडतोड केली गेली जात आहे. त्यावर बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की,
गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने बहुजन महापुरुषांचा, मनाला येईल तेव्हा अपमान करण्याचं एक षडयंत्र महाराष्ट्रात पाहायला मिळतं आहे.

अगदी संत तुकारामांपासून छत्रपती संभाजीमहाराजांपर्यंत महापुरुषांचा अपमान केला जातो आहे. त्यामुळे मला बोलणं भाग पडत आहे.
YouTube video player
मी बोलत असलो तरी हे पक्षाचं राजकारण नाही आणि मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणूनही मी बोलत नसतो असंही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी स्पष्ट केले.

तर आम्ही नॉन पॉलिटकल प्लॅटफॉर्मवर जाऊन बहुजनांचा इतिहास सांगत असतो. आणि हा आवाज बहुजनांचा आहे त्याचमुळे हे भाजपचं नेमकं दुखणं झालं आहे अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बोलताना सांगितले की, मी ज्या वेळी इतिहासवर बोलत असतो. मात्र त्यावेळी मुघलांचा इतिहास तुम्ही बाहेर काढत असता.

त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यात झालेल्या युद्धाचा खरा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेला तह, अफजलखानाचं लाखाचं सैन्य होतं,

तरी तेव्हा अफजलखानाला शरण येतो असं सांगून छत्रपती शिवाजी महाराज रिंगणात आणला आणि त्याचवेळी शिवाजी महाराजांची चालाकी दिसली ना. हा खरा इतिहासच आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत असल्चाचेही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

औरंगजेबला ज्या संपवण्यात आले, त्यानंतर शिवाजी महाराज यांनी दुप्पट केले शिवाजी महाराज यांनी मिळवले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपली माता जिजामाता यांचा आदेश कधी डावलला नाही.

जिजामाता यांनीच शिवाजी महाराज यांना सांगितले होते की, औरंगजेबबरोबर मैदानात कधीच लढायईचं नाही, त्यानुसारच छत्रपतींनी स्वराज्यासाठी नियोजन करून औरंगजेबला धडा शिकवला होता.

छत्रपती शिवाजी महाराज, औरंगजेब, मुघलांचा इतिहास आम्ही सांगितला तर यांच्या सगळ्या टीम कामाला लागल्या. बहुजनांचा इतिहास लपवण्याचा प्रयत्न केलं जातो आहे त्यामुळे आम्हाला आता बोलावं लागत आहे, खरा इतिहास सांगावा लागत आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सांगताना त्यांनी हेही सांगितले की, मी बहुजनांना सांगतो आहे की, तुमच्या बापजाद्यांचा इतिहास पुसला जातो आहे.

या सामाजिक चळवळीच्या इतिहासाबरोबरच जितेंद्र आव्हाड यांनी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीही त्यांनी इतिहास आणि भारतातील सामाजिक, राजकीय चळवळींचा इतिहास सांगितला.