मुंबई : सर्वोच्च न्यायालयात आमदारांच्या अपात्रतेविषयीचा सर्वोच्च निकाल थोड्याच वेळात धडकेल, पण त्यापूर्वीच खानापूर-आटपाडी मतदार संघात भाजप कुरघोडी करणार हे स्पष्ट झाले आहे. भाजप आमदार गोपीचंद पडाळकर यांनी गेल्यावर्षी मोठा गौप्यस्फोट केला होता. त्यानुसार, 2024 ची निवडणूक भाजपचा उमेदवार लढवेल असा दावा करण्यात आला. सत्ता संघर्षचा महाफैसला आता काही तासांतच येईल. यामध्ये खानापूर आटपाडी मतदार संघाचे आमदार अनिल बाबर यांचे नाव पण चर्चेत आहे. 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार लटकली आहे. चार वेळा या मतदार संघाचं प्रतिनिधीत्व केलेले अनिल बाबर (MLA Anil Babar) यांच्या आमदारकीचा फैसला लवकरच लागेल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता त्यांच्या अपात्रेसंदर्भात निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आला आहे.
अचानक झाले नॉट रिचेबल
सांगलीतील (Sangli) खानापूर तालुक्यातील गार्डी या गावी अनिल बाबर यांचा जन्म झाला. त्यांनी सरपंच पदापासून राजकारणाच्या विविध पायऱ्या पादाक्रांत केल्या. जिल्हा परिषद सदस्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. जुन्या पिढीसोबतच नवीन पिढीशी ते सहज मिसळून जातात. गेल्यावर्षी झालेल्या राजकीय उलथापालथीत ते अचानक नॉट रिचेबल झाले आणि शिंदे गटात ते सहभागी झाले.
पाणीदार-आमदार म्हणून ओळख
पश्चिम महाराष्ट्रात अनिल बाबर यांची पाणीदार आमदार अशी ओळख आहे. खानापूर-आटपाडी हा मतदारसंघाला दुष्काळाचा शाप आहे. या भागासाठी जायकवाडी प्रकल्पातून पाणी खेचून आणता येईल, यासाठी ते कायम प्रयत्नशील राहिले. त्यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षाकडून त्यांनी यासाठी जोरकस प्रयत्न केले. या योजनेला त्यांनी टेंभू योजना असे नाव दिले. आता उद्याच्या निकालानंतर ते विरोधकांना पाणी पाजतात की पडाळकर यांचा अंदाज खरा ठरतो हे स्पष्ट होईल.
या 16 आमदारांच्या पात्रतेवर होणार निर्णय
राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल गुरुवारी सकाळी 11 वाजता जाहीर होणार आहे. या निकालात 16 आमदार अपात्र होणार की नाही, याचाही निकाल सर्वोच्च न्यायालय देणार आहे. या सोहळा आमदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, संजय शिरसाट, तानाजी सावंत, यामिनी जाधव, चिमणराव पाटील, भरत गोगावले, लता सोनावणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमुलकर, रमेश बोरणारे आणि बालाजी कल्याणकर यांचा समावेश आहे.
आमदार अनिल बाबर यांचा प्रवास