MLA Suresh Dhas : ‘आका’ने तो व्हिडिओ पाहिला असेल तर…आमदार सुरेश धस यांचे मोठे भाकित, वाल्मिक कराडची मालमत्ता जप्त करण्याची केली मागणी

| Updated on: Dec 31, 2024 | 2:39 PM

MLA Suresh Dhas first Reaction : मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांनी अखेर सीआयडीसमोर नांग्या टाकल्या. संतोष देशमुख हत्याप्रकरण आणि दोन कोटींच्या खंडणीप्रकरणात कराडच्या अटकेची मागणी होत होती. या शरणागतीनंतर वेगाने चक्र फिरत आहेत.

MLA Suresh Dhas : आकाने तो व्हिडिओ पाहिला असेल तर...आमदार सुरेश धस यांचे मोठे भाकित, वाल्मिक कराडची मालमत्ता जप्त करण्याची केली मागणी
तो असाच शरण आला नाही, वाल्मिक कराडवर आमदास धस यांची पहिली प्रतिक्रिया
Follow us on

मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड (Valmik Karad) यांनी अखेर सीआयडी पुणे कार्यालयात शरणागती पत्करली. स्वतःच्या वाहनाने ते सीआयडीच्या पुणे येथील कार्यालयात दाखल झाले. संतोष देशमुख हत्याप्रकरण आणि दोन कोटींच्या खंडणीप्रकरणात कराडच्या अटकेची मागणी होत होती. गेल्या 22 दिवसांपासून पोलीस आणि सीआयडी त्यांच्या मागावर असल्याचा यंत्रणांचा दावा आहे. तर या नाट्यमय घडामोडीनंतर हे प्रकरण धसास लावणारे भाजपाचे आमदार सुरेश आण्णा धस यांनी पहिली तडख प्रतिक्रिया दिली आहे. आकाने जर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ पाहिला असेल तर काय कारवाई होणार याविषयी त्यांनी मोठे विधान केले.

वाल्मिक कराडला शरण येण्यास पाडले भाग

वाल्मिक कराड हा काही स्वखूशीने शरण आला नाही. त्याची मालमत्ता जप्त करण्यात येणार होती. त्याच्या पत्नीला चौकशीला घेऊन येणार होते. तर त्याची बँक खाती गोठवण्यात आली होती. त्यामुळे तो सीआयडीकडे शरण आल्याचा दावा आमदार धस यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणात जातीने लक्ष घातले. सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी ॲक्शन घेतल्यानंतर आका शरण आल्याचा दावा धसांनी केला.

हे सुद्धा वाचा

कराडची मालमत्ता जप्त करा

त्याच्या प्रॉपर्टी शीज करण्याची आता कोर्टाकडे सीआयडीने परमिशन मागितलेली आहे. साधारणतः या आठवड्यामध्ये किंवा जास्तीत जास्त पुढच्या आठवड्याच्या ही प्रक्रिया सुरू होईल. ही न्यायालयीन बाब आहे. त्याच्यावरती मी टिप्पणी करू इच्छित नाही. परंतु लवकरात लवकर त्यांच्या प्रॉपर्टीज झाल्या पाहिजेत प्रॉपर्टी स्टेटस झाल्याशिवाय अन्य गुन्हे जय हे आका करत होते ते उघडे पडणार नाहीत. यांच्या प्रॉपर्टीज झाल्याच पाहिजेत अशी मागणी धस यांनी केली.

तर आकावर 302 कलमातंर्गत गुन्हा

अन्य तीन आरोपींवर आमदार धस यांनी कठोर शिक्षेची मागणी केली आहे. आणखी तीन आरोपी ज्यामध्ये सर्वात सुदर्शन घुले हा जो प्रमुख आरोपी आहे ज्याने सुरुवातीला संतोष देशमुख यांना गाडीच्या खाली खेचून डायरेक्ट तिकडे गाडीमध्ये त्यांच्या गाडीमध्ये कोंबलेला आहे मारहाणी मध्ये सुद्धा सर्वाधिक जास्त तो आणि प्रतीक घुले या दोघांनी त्या ठिकाणी जास्त ॲक्शन घेतलेले आहे विष्णू चाटे हा आता सध्या 120 ब मध्ये घेतलेला आहे परंतु त्याला जर व्हिडिओ कॉलिंग करून दाखवले असेल तर तो सुद्धा याच्यामध्ये 302 मध्ये येईल, असा दावा त्यांनी केला.

याप्रकरणात वाल्मिक कराड शरण आलेला आहे. त्याच्यावर सध्या 120 ब अंतर्गत गुन्हा दाखल होतोच आपल्या अंदाजाप्रमाणं जर त्यांनीही व्हिडिओ कॉल पाहिला असेल तर ते सुद्धा 302 अंतर्गत येतील, असे वक्तव्य धस यांनी केले.