महाविकास आघाडीचे सरकार असताना वेदांता-फॉक्सक्वान प्रकल्प महाराष्ट्रात येणार नाही असं त्याचवेळचे तत्कालिन औद्योगिक मंत्र्यांनी स्पष्ट केले होते अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. त्यामुळे त्याचवेळी हेच स्पष्ट झाले होते. जानेवारी महिन्यामध्येच या कंपन्यांकडून मविआ सरकार असतानाच काय काय देण्यात येईल अशी विचारणा करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही कोणत्याही प्रकारे प्रतिसाद देण्यात आला नाही, त्यामुळे आता शिंदे सरकारवर ज्या प्रकारे टीका केली जाते आहे, त्यांच्याच हातात या कंपनीचा निर्णय घ्यायचा होता असंही त्यांनी सांगितले. त्यामुळे आता शिंदे सरकारवर जे खापर फोडण्यात येते आहे ते चुकीचे असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे हा प्रकल्प गुजरातला गेला असला तरी यापेक्षा मोठा प्रकल्प राज्याला देऊ असा विश्वास उदय सामंत यांनी यावेळी दिला आहे.