शिंदे साहेब तुम्ही सुद्धा हे ऐका… मिलिंद नार्वेकर लक्ष्य वेधत म्हणाले.. वाघाची शिकार करणार्‍याला दिसता क्षणी ठोका! सभागृहात जोरदार चर्चा

| Updated on: Mar 25, 2025 | 12:10 PM

Milind Narvekar Big Demand : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते मिलिंद नार्वेकर सभागृहात म्हणाले, शिंदे साहेब माझं ऐका, आपल्या दोघांना मिळून काही तरी करावं लागेल, त्यानंतर सभागृहात जोरदार चर्चा सुरू झाली. काय घडामोड घडली?

शिंदे साहेब तुम्ही सुद्धा हे ऐका... मिलिंद नार्वेकर लक्ष्य वेधत म्हणाले.. वाघाची शिकार करणार्‍याला दिसता क्षणी ठोका! सभागृहात जोरदार चर्चा
मिलिंद नार्वेकर यांची मोठी मागणी
Image Credit source: गुगल
Follow us on

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव आणि विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी सभागृहात मोठी मागणी केली. त्यांनी लक्षवेधी मांडत सभागृहाचे लक्ष वेधले. त्याचवेळी ते म्हणाले, शिंदे साहेब माझं ऐका, आपल्या दोघांना मिळून काही तरी करावं लागेल. त्यांच्या या मिश्किल शेऱ्यानंतर सभागृहात जोरदार चर्चा झडली. काय आहे अपडेट?

काय मांडली लक्षवेधी?

वाघाची शिकार तस्करी करणार्‍याला दिसता क्षणी ठोका, आसामच्या धर्तीवर राज्यात कठोर कायदा करा, आमदार मिलिंद नार्वेकर यांनी सभागृहात लक्षवेधी मांडली. शिंदे साहेब तुम्ही सुद्धा हे ऐका, आपल्या दोघांना यामध्ये मिळून काहीतर करावं लागेल, असे नार्वेकर म्हणाले. येथेच आपण कितीतरी वाघ बसले आहोत असं म्हणतो. आता याच आपल्या वाघांनी एकत्र येऊन या वाघांना वाचण्यासाठी काहीतरी करावं, असं म्हणत आपला प्रश्न मिलिंद नार्वेकर यांनी मांडला. वाघ वाचवण्यासाठी सरकारने ठोस पावलं उचलण्याची मागणी नार्वेकर यांनी केली. गेल्या काही दिवसात वाघाची शिकार करण्याचे प्रकार समोर आले आहेत. तर काही भागात वाघाची तस्करी करण्याचे प्रकारही समोर आले आहेत.

हे सुद्धा वाचा

याप्रकारे आसाम मध्ये गेंड्याच्या तस्करी करणाऱ्या टोळी विरोधात कठोर कायदा करण्यात आला आणि दिसताक्षणी गोळ्या घालायचा हा कायदा करण्यात आला. अगदी तसाच कायदा राज्यात सुद्धा करावा लागेल, राज्यात सुद्धा वाघाची तस्करी आणि शिकार करणार्‍यांची टोळी कार्यरत असल्याचा दावा मिलिंद नार्वेकर यांनी केला आहे.

राज्य सरकारची भूमिका काय?

राज्यात वाघाची तस्करी सुरू असून टिपेश्वर अभयारण्यातील पीसी वाघिणीची तस्करी करण्यासाठी तिच्या गळ्यात तारेचा फास अडकल्याची घटना ताजी असताना पवनार येथे पिकेडी टी- ३३ च्या वाघिणीच्या गळ्यातही असाच फास आढळला.  नार्वेकर यांनी वाघाच्या शिकार आणि तस्करीच्या विषयावर सभागृहाचे लक्ष वेधले.  त्यामुळे राज्यात अशा प्रकारचा कायदा करता येईल का? याचा आढावा घेऊन निर्णय घेऊ असं उत्तर वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले.