मुंबई : विलेपार्ल्यातील दीनानाथ नाट्यगृहाच्या दुरावस्थेवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबई महापालिकेवर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला. मुंबई महानगरपालिकेने पाच वर्षांपूर्वी दीनानाथ नाट्यगृहाची डागडुजी केलेल्या कामात तब्बल 16 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसे नेते आणि जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केला आहे. (MNS allegages Corruption of 16 crore in Dinanath Natyagriha repairing)
पाच वर्षांपूर्वी दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाची डागडुजी झाली. त्यासाठी तब्बल सोळा कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. एवढ्या रकमेत खरंतर एखादं अद्ययावत नवीन नाट्यगृह बांधून झालं असतं. मात्र, सोळा कोटी रुपये खर्च करुनही नाट्यगृहाचं काम तकलादूच आहे. असा आरोप अमेय खोपकर यांनी केला. तसेच पुन:श्च हरिओम म्हणून नाट्यप्रयोगांना परवानगी दिल्याबद्दल राज्य सरकारचं अभिनंदन करायचं की नाट्यगृहांची दूरावस्था बघून दूषणं द्यायची? असा प्रश्न त्यांनी मनपाला विचारला आहे.
तसेच, जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाने जेव्हा नाट्यगृहांची पाहणी सुरु केली तेव्हा त्यांना धक्काच बसला. कोरोनाकाळात स्वच्छतेला सर्वाधिक महत्त्व द्यायला हवं, पण दीनानाथ नाट्यगृहात तर सगळा उफराटा कारभार आहे. या नाट्यगृहात प्रसाधनगृहांची अवस्था इतकी वाईट असेल तर तिथे प्रेक्षकांनी का यावं? असं खोपकर म्हणाले. केवळ पाचच वर्षांपूर्वी सोळा कोटी रुपये खर्च करुन डागडुजीच्या नावाखाली महापालिकेने नेमके कुणाचे खिसे गरम केले होते? असा खडा सवालही त्यांनी केला.
दरम्यान, नाट्यगृहांच्या दुरवस्थेवरुन मनसे जास्तच आक्रमक झाली आहे. खोपकर यांनी यावेळी कलाकारांच्या पाठीशी उभं राहण्याचं नाटक कशाला करायचं असा सवाल राज्य सरकार आणि मुंबई मनपाला केला आहे. दीनानाथ नाट्यगृहाच्या कामासाठी शहा नावाचे सुपरवायझर आहेत. डागडुजीचे काम कधी संपणार त्यांनाही माहिती नाही. असं असेल तर मग अशा वास्तूत नाट्यप्रयोगांना परवानगी देऊन सरकार काय साध्य करु पाहतंय? कलाकारांच्या पाठीशी उभं राहण्याचं नाटक कशाला करायचं असं खोपकर म्हणाले.
मुंबईतील दीनानाथ नाट्यगृहाच्या डागडुजी मध्ये तब्बल १६ कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष/मनसे सरचिटणीस श्री अमेय खोपकर ह्यांनी केला आहे.@MNSAmeyaKhopkar pic.twitter.com/wBq6BnVFsZ
— MNS Report (@mnsreport9) November 7, 2020
14,500 सोडत धारकांना 1000 रुपयेच मुद्रांक शुल्क, सिडकोचा निर्णय, मनसेच्या पाठपुराव्याला यश
(MNS allegages Corruption of 16 crore in Dinanath Natyagriha repairing)