मुंबई : गेल्या काही दिवसांपासून खासगी रुग्णालये कोरोना रुग्णांकडून हवे तेवढे पैसे उकळत आहे. याबाबत अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र तरीही खासगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची लूट थांबताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर मनसेने सरकारने रुग्णालयांना ठरवून दिलेले दरपत्रक आपल्या बॅनरवर छापले आहेत. तसेच जे कोणी रुग्णांची फसवणूक करेल त्याल मनसेचा दणका बसेल, असेही या बॅनरवर लिहिण्यात आले आहेत. (MNS Banner on Private Hospital Overcharging Money From covid patient)
“रुग्णांच्या फसवणुकीविरोधात मनसे खंबीर आहे. जर कोणतेही रुग्णालय कोविड 19 च्या रुग्णांकडून शासनाने प्रमाणित केलेल्या नियमाचे उल्लंघन करुन स्वत:चे अधिक दर लावत असल्यास आम्हाला संपर्क करा, मनसे दणका नक्कीच बसेल,” अशा आशयाचे बॅनर मनसेने लावले आहेत. यात मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांचे फोन नंबरही देण्यात आले आहेत.
या बॅनरवर सरकारने रुग्णालयांना ठरवून दिलेले दरपत्रक दिसत आहे. तसेच जर कोणी या दरापेक्षा जास्त दर आकारले तर तक्रार करण्यासाठी नंबरही दिले आहेत. मनसेचे सरचिटणीस नयन कदम यांनी हे बॅनर छापले आहे.
काही दिवसांपूर्वी बोरीवलीतील खाजगी रुग्णालय अव्वाच्यासव्वा रक्कम आकारत असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे मनसेने आता अशा बॅनरच्या माध्यमातून नागरीकांना आवाहन केले आहे. (MNS Banner on Private Hospital Overcharging Money From covid patient)
आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ व्हावी ह्या मागणीसाठी पक्षाचे नेते श्री. अमित ठाकरे आणि श्री. बाळा नांदगावकर ह्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार ह्यांची भेट घेतली. त्यावेळी ह्या स्वयंसेविकांचं मानधन ४००० रुपये करू असं आश्वासन श्री. अजित पवार ह्यांनी दिलं pic.twitter.com/KwgxyKLAX8
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) June 23, 2020
संबंधित बातम्या :
अमित ठाकरेंची मागणी अजित पवारांकडून मान्य, आशा सेविकांचे मानधन वाढवण्याचा शब्द