मुंबई : लोकसभेच्या निवडणूकांच्या तारखांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. शेवटी आज निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद ही घेण्यात आली. हेच नाही तर मोठ्या घोषणा देखील करण्यात आल्या. केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणूकीच्या तारखा आणि टप्पे जाहीर केले. एकून सात टप्प्यात ही लोकसभेची निवडणूक पार पडत आहे. एप्रिल ते जून या कालावधीमध्ये लोकसभेची निवडणूक ही पार पडणार आबहे. एप्रिलमध्येच या निवडणूकीचा पहिला टप्पा हा पार पडेल. जवळपास सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणूकीची जोरदार तयारी केल्याचे बघायला मिळतंय.
लोकसभेच्या निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर अनेक नेत्यांनी त्यावर भाष्य करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. आता राज ठाकरे यांची हो पोस्ट तुफान व्हायरल होताना दिसतंय. लोकसभेच्या पार्श्वभूमीवरच राज ठाकरे यांनी ही पोस्ट केलीये.
लोकसभेची निवडणूक जाहीर झाली, ही संधी ५ वर्षातून एकदाच येते, आता तुमच्या भावना मतपेटीतून व्यक्त करा.. अघोरी राजकारण वठणीवर आणा. राज ठाकरे यांनी मदतदारांना एक प्रकारे मोठे आवाहनच केल्याचे बघायला मिळतंय अघोरी राजकारणाला वठणीवर आणाच, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
लोकसभेच्या निवडणूकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागेल. काही ठिकाणी अजूनही जागांचा तिढा हा सुटलेला नाहीये. अनेक पक्षांनी उमेदवारांच्या नावाची घोषणा देखील केलीये. भाजपाने काही दिवसांपूर्वीच उमेदवारांची यादी देखील जाहीर केली. मात्र, काही जागांचा तिढा सुटलेला दिसत नाहीये.
लोकसभेची निवडणूक जाहीर झाली, ही संधी ५ वर्षातून एकदाच येते, आता तुमच्या भावना मतपेटीतून व्यक्त करा.. अघोरी राजकारण वठणीवर आणा !#लोकसभा_निवडणूक #मतदार #राजकारण pic.twitter.com/M3W9eA8FaJ
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 16, 2024
दुसरीकडे लोकसभेच्या निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर संजय राऊत यांनी मोठा आरोप केला. संजय राऊत यांनी थेट निवडणूक आयोगावरच निशाना साधला आहे. संजय राऊत हे म्हणाले की, निवडणूक आयोगाचे दबावाखाली काम सुरू आहे. देशातील मतदारांचा ईव्हीएमवर विश्वास नाही. आता निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्या म्हटले की, आरोप प्रत्यारोपाचे सत्र हे सुरूच राहणार आहे.