Raj Thackeray | टोलप्रश्नी मनसेची भूमिका काय, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतरची ही आहे अपडेट

| Updated on: Oct 12, 2023 | 7:55 PM

Raj Thackeray | टोलचा मुद्दा पुन्हा एकदम गरम झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आज मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची सह्याद्रीवर बैठक झाली. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत काय घडलं असं त्यांना विचारण्यात आलं. त्यावेळी राज ठाकरे आपल्या खास स्टाईलमध्ये म्हणाले, एका वाक्यात सांगतो!

Raj Thackeray | टोलप्रश्नी मनसेची भूमिका काय, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतरची ही आहे अपडेट
Follow us on

मुंबई | 12 ऑक्टोबर 2023 : राज्यातील टोल प्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज भेट घेतली. सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक झाली. ठाणे पासिंगच्या वाहनांना टोल माफ करण्यासंदर्भात लवकरच निर्णय होण्याची शक्यता या बैठकीतून समोर आली आहे. नागरिक रोड टॅक्स देत असेल तर त्यांच्यावर टोलचा भार कशाला असा रोकडा सवाल राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केला. त्यांनी टोल भरुन पण राज्यातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. ठाणे, नाशिककरांनी याविषयी तक्रारी केल्याचे त्यांनी निदर्शनास आणूनन दिले. ही बैठक संपल्यानंतर त्यांनी याविषयावर अधिक बोलण्यास नकार दिला.

काय म्हणाले राज ठाकरे?

‘मी तुम्हाला एकच वाक्य सांगणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली. उद्या सकाळी 8 वाजता माझ्या घरी बैठक आहे. या बैठकीतील निर्णयाविषयी 10 वाजता पत्रकार परिषद घेऊन सांगेन, टोलबाबात काय निर्णय होणार हे उद्या सकाळी सांगेन’, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा

सह्याद्रीवर काय झालं

राज ठाकरे यांचा ताफा सांयकाळी चार वाजता सह्याद्री अतिथीगृहीकडे वळला. त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. टोल नाक्यावर त्यांनी रोखठोक भूमिका मांडली. जर नागरिकांनी अगोदरच रोड टॅक्स दिला असेल तर त्यांच्यावर टोलचा भार कशाला, असा रोखठोक सवाल त्यांनी विचारला. राज्यातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबाबत ही त्यांनी परखड मत मांडले. टोल नाक्यांवरील असुविधांचा त्यांनी पाढा वाचला. महिलांसाठी टोल नाक्यावर शौचालय का नाही, असा सवाल त्यांनी विचारला. छोट्या वाहनांना टोलमधून वगळण्याची मागणी त्यांनी केली.

उद्याची घडामोड काय


उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी उद्या सकाळी 8 वाजता संबंधित अधिकाऱ्यांचीशी चर्चा होईल. त्यानंतर सकाळी 10 वाजता ते प्रसार माध्यमांशी टोलच्या मुद्यावर त्यांची भूमिका स्पष्ट करतील. टोल नाक्यांविरोधात यापूर्वी मनसेचे आंदोलन राज्यभर गाजले होते. टोल नाके बंद करण्याची मागणी त्यावेळी करण्यात आली होती.