मुंबई : लॉकडाऊनच्या काळात आलेल्या वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरुन मनसे पक्ष पुन्हा एकादा आक्रमक झाला आहे. मनेसे नेते यशवंत किल्लेदार यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर वाढीव वीजबिलाबाबत फसवणुकीच्या आरोपाखाली तक्रार दाखल केली आहे. (MNS file complaint against energy minister Nitin Raut)
मागील काही दिवसांपासून वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरुन भाजप, मनसे तसेच इतर विरोधीपक्ष महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरत आहेत. नागिराकंना वाढीव विजबिलातून सूट देण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. याच मागणीला घेऊन मनसेने यापूर्वी मुंबईत निदर्शन केले होते. त्यावेळी मनेसेने केलेली पोस्टरबाजी हा राज्यभर चर्चेचा विषय बनला होता. आता पुन्हा याच मुद्द्यावरुन मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. मनसेचे नेते यशवंद किल्लेदार यांनी थेट उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत नितीन राऊत यांनी फसवणूक केल्याचं त्यांनी म्हटलंय.
“ऊर्जा विभागातील मंत्री आणि अधिकाऱ्यांविरोधात आम्ही तक्रार केली आहे. लॉकडाऊनमध्ये मीटर रिडिंग झालं नाही. आधीच लोक वैतागलेले असताना अधिकचे दर लावून नागरिकांना बील पाठवले गेले. याबाबत आम्ही मंत्र्यांना भेटलो. राज्यपालांशीही आम्ही याबाबत चर्चा केली. मात्र यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही,” असे तक्रारदार य़शवंत किल्लेदार म्हणाले. तसेच, दिवाळीला गोड बातमी मिळेल असं मंत्र्यांनी सांगितलं होतं. मात्र, तसं काही झालं नाही. सरकारने लोकांची फसवणूक केली आहे, असा आरोपही त्यांनी सरकारवर केला.
दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (25 जानेवारी) वीजबिलावरुन सरकारला धारेवर धरलं. जेवढी वीज वापरली तेवढे बील देऊ, पण जी वीज वापरलीच नाही ते वीजबिल देणार नाही, असे फडणवीसांनी सरकारला ठणकावले होते. त्यानंतर आता मनसेने उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे.
संबंधित बातम्या :
(MNS file complaint against energy minister Nitin Raut)