Ajit Pawar : “संजय राऊत यांनी करून दाखवलं, शिवसेनेनंतर राष्ट्रवादीही फोडून दाखवली”

| Updated on: Jul 02, 2023 | 3:17 PM

अजित पवार यांनी शिदें-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला आहे. अजित पवार यांच्यासोबत 30 ते 40 आमदार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता शिवसेनेनंतर सेनेनंतर राष्ट्रवादीही फुटली असल्याचं निश्चित झालं आहे.

Ajit Pawar : संजय राऊत यांनी करून दाखवलं, शिवसेनेनंतर राष्ट्रवादीही फोडून दाखवली
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : राज्याच्या राजकारणामध्ये परत एकदा परत एकदा राजकीय भूकंप पाहायला मिळाला आहे. राष्ट्रवादीचे फायरब्रँड नेते आणि विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी शिदें-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला आहे. अजित पवार यांच्यासोबत 30 ते 40 आमदार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता शिवसेनेनंतर सेनेनंतर राष्ट्रवादीही फुटली असल्याचं निश्चित झालं आहे. आता राज्यात दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. अशातच या राजकीय भूकंपाच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते गजानन काळे यांनी थेट ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

विश्व प्रवक्ते संजय राऊत यांनी करून दाखवले. नुसती सेना नाही तर राष्ट्रवादी पण फोडून दाखवली, असं म्हणत गजानन काळे यांनी टीका केली आहे. मनसे नेते काळे यांनी राऊतांवर निशाणा साधला असली तरी दुसरीकडे संजय राऊत यांनीही ट्विट केलं आहे.

 

संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये, माझं शरद पवार यांच्याशी बोलणं झालं असून ते खंबीर असल्याचं त्यांनी सांगितलं असल्याचं राऊत यांनी सांगितलं. अजित पवारांनी याआधी बंड केलं होतं मात्र त्यावेळी बंड यशस्वी झालेलं नव्हतं. मात्र आता पवारांनी शरद पवार यांचे निकटवर्तीय यांनाही आपल्यासोबत घेतलं आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी माहिती देताना पवारांसोबत राष्ट्रवादीचे 40 आमदार असून त्यांचं पक्षामध्ये स्वागत करत असल्याचं सांगितलं. अजित पवार, उपमुख्यमंत्री, छगन भुजबळ, कॅबिनेट मंत्री, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील या नेत्यांनी राष्ट्रवादीकडून शपथ घेतली आहे.