लोकांना अंधारात ढकलणाऱ्या सरकारला गाडून टाका, वीज बिल मुद्यावर मनसे आक्रमक

| Updated on: Jan 20, 2021 | 2:14 PM

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी वीज बिल प्रश्नावरुन राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. Bala Nandgaonkar Thackeray Government

लोकांना अंधारात ढकलणाऱ्या सरकारला गाडून टाका, वीज बिल मुद्यावर मनसे आक्रमक
बाळा नांदगावकर, मनसे नेते
Follow us on

मुंबई: मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी वीज बिल, मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्य सरकार आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे. महावितरणनं वीज ग्राहकांना वीज बिल भरलं नाहीतर वीज कापण्याचा इशारा देण्यात आला आहे. सरकारकडून एका बाजूला वीज बील माफ करण्याबाबत वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. ऊर्जा मंत्री गोड बातमी देऊ असं सांगतात. 100 यूनिटपर्यंत वीज मोफत देऊ असं सागतात. हे सरकार लोकांच्या भल्यासाठी आलेले नाही. हे लोकांचे दुश्मन आहेत हे जनेतला कळलं पाहिजे, असं नांदगावकर म्हणाले. ( MNS leader Bala Nandgaonkar criticize Thackeray Government over electricity bill issue)

लोकांना अंधारात ढकलणाऱ्या सरकारला गाडून टाका

वीज बिल भरलं नाहीत तर वीज तोडण्याचा निर्णय हा तुघलकी स्वरुपाचा आहे. या सरकाला लोकांना निश्चितपणे अंधारात ढकलायचं आहे. हे सरकार लोकांच्या भल्यासाठी आल्याचं दाखवतं आहे मात्र ते तीन पक्षांच्या भल्यासाठी आलेले आहे. जनतेने सरकारला गाडून टाकावं, आवाहन बाळा नांदगावकर यांनी केले. मनसे वीज बीलप्रश्नी रस्त्यावर उतरली, आंदोलन केले, निवेदन दिले हात जोडले, मनसेने वीज बिल प्रश्नी काय आणखी काय करायला पाहिजे, असा सवाल नांदगावकरांनी केला. हे सरकार लोकांना अंधारात ढकलणार असेल तर लोकांनीही राज्य सरकारला अंधारात ढकलायला तयार राहिलं पाहिजे, असं बाळा नांदगावकर म्हणाले.

मराठा समाजावर अन्याय का?

मराठा आरक्षणाची सुनावणी 5 फेब्रुवारीला होणार आहे याविषयी बोलताना बाळा नांदगावकरांनी सरकार चालढकल करत असल्याचं म्हटलं. राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत चालढकल का करत आहे. वारंवार वेळ वा का मागितली जात आहे. जर आरक्षण द्यायचंच आहे तर देऊन टाका उगा टांगती तलवार ठेऊ नका. मराठा समाजावर अन्याय का केला जात आहे, असा सवाल बाळा नांदगावकरांनी राज्य सरकारला केला आहे.

शिवसेनेचं हिंदुत्व बदललं

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आता राहिली नाही. शिवसेना बदलली असल्याचं राज्यात महाविकास आघाडी सरकार बनवतात सिद्ध झालं आहे, अशी टीकाही बाळा नांदगावकरांनी केली. शिवसेनेचे हिंदुत्त्व आता बदललं आहे, असंही नांदगावकर म्हणाले.


संबंधित बातम्या:

राजू शेट्टींचा मुद्द्याला हात, महाविकास आघाडीवर पुन्हा घणाघात

Maratha Reservation|भाजप नेत्यांचं समाधान करण्यापेक्षा मराठा समाजाला न्याय द्या : देवेंद्र फडणवीस

( MNS leader Bala Nandgaonkar criticize Thackeray Government over electricity bill issue)