Yashwant Killedar : नो टू हलाल मोहीम राबविणार, मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांचा इशारा

| Updated on: Aug 27, 2022 | 3:02 PM

सर्व अर्थ व्यवस्थेवर नियंत्रण मिळवण्याचा छुपा हेतू आहे. येत्या काळात आम्ही पत्रक छापून हा विषय संबधित कंपन्यांच्या लक्षात आणून दिला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

Yashwant Killedar : नो टू हलाल मोहीम राबविणार, मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांचा इशारा
मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांचा इशारा
Image Credit source: facebook
Follow us on

मुंबई : मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी किल्लेदार म्हणाले, हलाल आणि झटका या कत्तलीच्या पद्धती आहेत. हा मुद्दा फक्त धार्मिक (religious) आहे असं नाही. 15 टक्के मुस्लिम धर्मीयांसाठी हलाल पद्धत असली तरी इतर धर्मियांनी हे का मानायचं. अरब देशात हलाल केलेल्या मासाची मागणी आहे. म्हणून हे जास्त केलं जातं. याचे पैसे अतिरेकी केसेस लढण्यासाठी वापरतात. यासाठी जनजागृती म्हणून चळवळ उभी करणार आहोत. या चळवळीचे नाव राहणार आहे, नो टू हलाल मोहीम राबविणार अशी माहिती मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी दिली. आमचा विरोध हलालला नाही पण झटका मीटही विकले पाहिजे. पत्र देऊनही ऐकले तर ठीक न ऐकल्यास संबधित कंपनींना मनसे स्टाईलने (MNS style) उत्तर दिले जाईल. येत्या काळात व्यापाऱ्यांच्या असोसिएशनचीही (trade association) बैठक घेऊन त्यांना मुद्दा स्पष्ट करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

पाहा व्हिडीओ

हलाल ही क्रूर पद्धत

हलाल ही क्रूर पद्धत आहे. हलाल इस्लामी पद्धतीने प्राण्यांची कत्तल करण्याची पद्धत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला हलालचा फटका बसतो. हलालच्या माध्यमातून मिळणारा पैसा दहशतवादी संघटनांसाठी वापरला जातो. दहशतवाद्यांच्या केसेससाठी हा पैसा वापरला जातो. हिंदू, शिख, ख्रिस्ती धर्मीय झटका पद्धतीचे मांस खातात. मूळ मांसासाठी असणारे हलाल प्रमाणपत्र आता खाद्यपदार्थ सौंदर्यप्रसाधने आयुर्वेदिक औषधे रुग्णालय यांच्यासह मॅकडोनाल्ड केएफसी या कंपन्यांनी घेतले आहे. इस्लामी अर्थव्यवस्था भारतात उभी केली जात आहे. हलालमुळे हिंदू खाटीक वाल्मिकी समाजास रोजी रोटी मिळत नाही. हलाल ही पद्धत मुस्लिमांना पाहिजे तर त्यांनी ठेवावी पण इतरांवर लादू नये. आम्ही येत्या काळात पत्रक काढू ज्या कंपन्या आहेत माहिती देऊ. अन्यथा मनसे आपल्या पद्धतीने आंदोलन करेल. हलाल हा धार्मिक मुद्दा नाही तर अर्थव्यवस्थेवर त्याचा होणारा परिणाम याकडे आम्ही पाहतोय. मुस्लिम धर्मियांकडून बकऱ्याची कट करण्याची पद्धत ही क्रूर आहे. ऐवढचं नाही तर मक्क्याकडे तोंड करून त्यांची कत्तल होते, ही दखल घेण्याजोगी बाब असल्याचं यशवंत किल्लेदार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

बाजारात हलाल मीट घेण्यावर दबाव वाढतोय

15 टक्के मुस्लिम धर्मियांची ही पद्धत 85 टक्के लोकांवर का लादायची, असा सवाल यशवंत किल्लेदार यांनी उपस्थित केला. सरकारने एकदा का त्यांना या गोष्टीच्या आयात व निर्यातीला परवानगी दिली की, इतर पदार्थही याद्वारे पाठवली जात आहे. यातून जमा होणारा पैसा कशासाठी वापरला जातो. तर देशा विरोधात करण्यात आलेल्या कारवाईंमध्ये अटक केलेल्या आरोपींच्या न्यायालयीन गोष्टीसाठी वापरला जात असल्याचे समोर आले आहे. लवकरच याबाबत मनसे ‘नो टू हलाल’ ही मोहीम राबवणार आहेत. बाजारात हलालचे मीट घेण्यावर दबाव वाढत आहे. मात्र झटका मीटवर विरोध होत आहे. हा विषय फक्त मांसाहारबाबत नाही. तर इतर पदार्थावरही हलालचं सर्टिफिकेशन वापरलं जात आहे. सर्व अर्थ व्यवस्थेवर नियंत्रण मिळवण्याचा छुपा हेतू आहे. येत्या काळात आम्ही पत्रक छापून हा विषय संबधित कंपन्यांच्या लक्षात आणून दिला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.