Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या सर्वाधिक आमदारांचा पाठिंबा कोणाला? समोर आली संपूर्ण यादी!

| Updated on: Jul 02, 2023 | 8:24 PM

Maharashtra political Update : आता नेमके सर्वाधिक आमदार कोणासोबत आहेत, संख्याबळ कोणाकडे जास्त आहे? याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र अशातच एक यादी समोर आली आहे.

Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या सर्वाधिक आमदारांचा पाठिंबा कोणाला? समोर आली संपूर्ण यादी!
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादीचे फायरब्रँड नेते अजित पवार परत एकदा भाजपसोबत गेले आहेत. यावेळी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये जात त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांनी आपल्यासोबत अनेक आमदार असल्याचं सांगितलं आहे मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या शपथविधीला आपला पाठिंबा नसल्याचं जाहीरपणे सांगितलं आहे. इतकंच नाहीतर अजित दादांनी पक्षासह चिन्हावर आपला दावा केला आहे. मात्र आता नेमके सर्वाधिक आमदार कोणासोबत आहेत, संख्याबळ कोणाकडे जास्त आहे? याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र अशातच एक यादी समोर आली आहे.

अजित पवार यांच्यासोबत असलेले आमदार

अजित पवार (बारामती), छगन भुजबळ (येवला), दिलीप वळसे पाटील (आंबेगाव), हसन मुश्रीफ (कागल), धनंजय मुंडे (परळी), धर्मराव बाबा आत्राम (अहेरी), माणिकराव कोकाटे (सिन्नर), नरहरी झिरवाळ (दिंडोरी), आदिती तटकरे (श्रीवर्धन) ,दत्तात्रय भरणे (इंदापूर), दौलत दरोडा (शहापूर), शेखर निकम (चिपळूण), सरोज अहिरे (देवळाली), किरण लहाने (अकोले), अशोक पवार (शिरूर), संजय बनसोडे (उदगीर), अनिल पाटील (अमळनेर), सुनील टिंगरे (वडगाव शेरी), निलेश लंके (पारनेर) , सुनील भुसारा (विक्रमगड), अतुल बेनके (जुन्नर), संग्राम जगताप (अहमदनगर), आशुतोष काळे (कोपरगाव), चेतन तुपे (हडपसर), सुनील शेळके (मावळ), अण्णा बनसोडे (पिंपरी), दिलीप मोहिते (खेड आळंदी)

शरद पवार यांच्यासोबत असलेले आमदार

जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), राजेश टोपे (घनसावंगी), अनिल देशमुख (काटोल), जयंत पाटील (इस्लामपूर), बाळासाहेब पाटील (अहमदपूर), शामराव पाटील (कराड उत्तर), प्रकाश सोळंके (माजलगाव), राजेंद्र शिंगणे (सिंदखेड राजा), नवाब मलिक (अणुशक्ती नगर), प्राजक्त तनपुरे (राहुरी), बाळासाहेब आजबे (आष्टी), राजू कारेमोरे (तुमसर), मनोहर चंद्रिकापुरे (अर्जुनी मोरगाव), दीपक चव्हाण (फलटण), अशोक पवार (शिरूर), मकरंद जाधव (वाई), चंद्रकांत नवघरे (बसमत), इंद्रनील नाईक (पुसद), मानसिंग नाईक (शिराळा), नितीन पवार (कळवण), रोहित पवार (कर्जत जामखेड), राजेश पाटील (चंदगड), सुमन पाटील (तासगाव कवठे महाकाळ), दिलीपराव बनकर (निफाड), यशवंत माने (मोहोळ), बबनराव शिंदे (माढा) संदीप क्षीरसागर (बीड)

ही यादी समोर आली असली तरी शरद पवार आणि अजित पवार यांनी कोणताही अधिकृत आकडा सांगितलेला नाही. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दोन ते तीन दिवसात याबाबत सांगणार असल्याचं सांगितलं आहे. तर दुसरीकडे अजित पवारांनी आमच्याकडे सर्व आमदार असून तुम्ही काही काळजी करू नका, असं  म्हटलं आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसात संख्याबळ कोणासोबत जास्त आहे हे समोर येईल.