2024 मध्येही एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री, शिंदे गटातील नेत्याचा विश्वास…

| Updated on: Nov 15, 2022 | 9:10 PM

हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार असा विश्वासही गजानन कीर्तीकर यांनी व्यक्त केला आहे.

2024 मध्येही एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री, शिंदे गटातील नेत्याचा विश्वास...
Follow us on

मुंबईः सध्या राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. त्यातच राज्यातील शिंदे-ठाकरे गटातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटातील खासदार गजानन कीर्तीकर शिंदे गटा सामील झाल्यामुळेही प्रचंड खळबळ उडाली होती. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनीही त्यांच्या गट प्रवेशाबद्दल नाराजी व्यक्त करत, कीर्तीकर शिंदे गटात सामील झाल्याने खरं दुःख झाल्याचंही त्यांनी म्हटले होते.

त्यानंतर संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी आज त्यांची काही चूक नव्हती असं म्हणत त्यांनी शिंदे गटाला घरचे आहेर दिले होते.

त्यानंतर आताही गजानन कीर्तीकर यांनी राऊत यांच्यावरील वक्तव्यानंतर 2024 मध्येही एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील असं मोठं वक्तव्यही त्यानी केले आहे. त्यामुळे शिंदे गटासह भाजपच्या गोठातही खळबळ उडाली आहे.

खासदार गजानन किर्तीकर यांनी एकीकडे 2024 मध्ये एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होतील असं वक्तव्य केलं होतं, तर दुसरीकडे नरेंद्र मोदी यांच्याविषयीही त्यांनी वक्तव्य करत 2024 मध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच सरकार येईल असं मोठं वक्तव्य केलं आहे.

खासदार गजानन कीर्तीकर नुकतेच शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यानंतर त्यांनी लगेच शिंदे गटाची बाजू मांडत हे शिंदे गटाचे सरकार पडणार नाही. त्यामुळे हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आणि त्यांच्याजवळील नेत्यांवरही त्यांनी निशाणा साधला. ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या बाजूला असलेल्या लोकांनी चुकीचे सल्ले दिले असल्यानेच राजकीय निर्णय चुकले आहेत.

म्हणून संघटनेचं वाटोळं झालं असल्याचे मत त्यांनी मांडले. ठाकरे गटासाठी आदित्य ठाकरे प्रयत्न करत आहेत आणि ते त्यांच्या प्रयत्नांना यश मिळो अशा शुभेच्छाही त्यांनी त्यांना दिल्या आहेत.

संजय निरुपम यांनी कीर्तीकर पक्ष सोडून गेल्यानंतर पक्षाचा आणि पदाचाही राजीनामा द्या निवडणूक लढवा असं जाहीर आवाहन केलं आहे.

त्यानंतर गजानन कीर्तीकर यांनी संजय निरुपम यांनाही त्यानी 2024 ला माझ्या विरोधात निवडणूक लढावावी पावणे चार लाखांनी हरवणार आणि मग राजीनामा देणार असा सज्जड दमही त्यांनी संजय निरुपम यांना दिला आहे.