मुंबईः शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्या म्हाडाच्या वांद्रेमधील कार्यालय जमीनदोस्त करण्यात आले आहे. अनिल परब यांच्या कार्यालयाव कारवाई करण्यात आल्याने आता राजकारण तापले आहे. त्यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गट आता आमनेसामने आले आहेत. त्यातच आता म्हाडाकडे जागेचा नकाशा नसल्याने त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. अनिल परब यांच्यावर कारवाई झाल्यानंतर आणि होण्याआधी किरीट सोमय्यांकडून टीका केली जात असल्याने ठाकरे गटाकडून किरीट सोमय्यांवर सडकून टीका केली जात आहे.
ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी किरीट सोमय्यांविषयी बोलताना म्हणाल्या की, किरीट सोमय्या हा तथ्य नसलेला माणूस असल्याची जहरी टीका करण्यात आली आहे.
अनिल परब यांच्यावर कारवाई झाल्यानंतर ज्या त्वेषाने किरीट सोमय्या यांच्याकडून अनिल परब यांच्यावर बेताल वक्तव्य केली जात आहेत. आणि ती वक्तव्य चुकीची असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
अनिल परब यांच्या कार्यालयावर कारवाई करण्यात आल्यानंतर अनिल परब यांनी जागेच्या नकाशाची मागणी केली होती. त्यावेळी म्हाडाकडे नकाशा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर अनिल परब यांनी नकाशा दाखवा अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशाराही म्हाडाला देण्यात आला आहे.
त्यावर बोलताना प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटले आहे की, किरीट सोमय्यांनी अनिल परब यांना तोंडावर दाखवून दिलं आहे की ही कारवाई चुकीचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
तर अनिल परब यांच्यावर कारवाई झाल्यानंतर प्रियंका चतुर्वेदी यांनी भाजपवरही जोरदार हल्लाबोल केला आहे. या प्रकारच्या कारवाईसाठी भाजपनं काही लोकांना सोडलंय आहे,
ते मग कधी हातोडा घेऊन पळतात तर कधी कारवाईसाठी गडबड करत असतात आणि हे खूप हास्यास्पद असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे अशा चुकीच्या कारवाई करणे आणि पत्रकार परिषदा घेऊन आणि आरोप करणे एवढचं यांचे काम आहे अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे.
किरीट सोमय्या भ्रष्ट मंत्र्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी करतात, त्याचवेळी त्यांच्याकडून आपण सीए असल्याचेही अनेकदा सांगितले जाते. त्यांच्या या सीए पदवीवरच प्रियंका चतुर्वेदी यांनी शंका उपस्थित करुन सोमय्यांची सीएची पदवी तपासावी लागेल असा टोला सोमय्यांना लगावला आहे.
प्रियंका चतुर्वेदी यांनी ठाकरे गटाच्या शीतल म्हात्रे यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला आहे. शीतल म्हात्रे यांची अवस्था ही न घर का न घाट का अशी झाली आहे.
तर टीव्हीवर येऊन बोललं म्हणजे काम केलं असं फक्त दाखवलं जातं अशी टीकाही त्यांनी त्याच्यावर केली आहे. शिंदे गटाकडून वारंवार विरोधकांवर बोलताना त्यांच्याकडून दुसऱ्याची मानसिक अवस्था आणि बेताल पणे बोलले जाते मात्र शिंदे गटालाच अक्कल नाही असंही त्यांनी म्हटले आहे.