Rahul Shewale | हा सामना रंगणार … राहुल शेवाळे हे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना कोर्टात खेचणार

| Updated on: Jan 04, 2023 | 8:55 PM

सामना वृत्तपत्रातून ज्या बातम्या छापून आल्या आहेत त्या खोट्या असल्याचा दावा राहुल शेवाळे यांनी केला आहे. त्याप्रकरणीच त्यांनी अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे.

Rahul Shewale | हा सामना रंगणार ... राहुल शेवाळे हे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना कोर्टात खेचणार
Follow us on

मुंबईः शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रामध्ये माझ्या विरोधात छापण्यात आलेल्या बातम्या या खोट्या असल्याचा दावा खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गट असा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे.

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आपल्या संदर्भात छापलेल्या सामना वृत्तपत्रात छापलेल्या बातम्या या खोट्या असल्याचे सांगत संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना नोटीस पाठविण्यात आली आहे.

खासदार राहुल शेवाळे आणि ठाकरे-राऊत हा वाद गेल्या काही दिवसांपासून जोरदारपणे रंगला आहे. हिवाळी अधिवेशनानंतर हा वाद आणखी जोरदारपणे उफाळून आला आहे.

त्यातच सामना वृत्तपत्रात छापण्यात आलेल्या बातम्या या खोट्या असल्याचे सांगत राहुल शेवाळे यांनी अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. त्यामुळे राऊत आणि ठाकरे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

खासदार राहुल शेवाळे आणि राऊत-ठाकरे वाद गेल्या काही दिवसांपासून जोरदारपणे उफाळून येत आहे. सामना वृत्तापत्रातून खासदार राहुल शेवाळे यांच्या बातम्या छापून आल्या आहेत.

सामना वृत्तपत्रातून ज्या बातम्या छापून आल्या आहेत त्या खोट्या असल्याचा दावा राहुल शेवाळे यांनी केला आहे. त्याप्रकरणीच त्यांनी अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे.

सामना वृत्तपत्रात छापून आलेल्या बातम्या खोट्या असल्याचा दावाही राहुल शेवाळे यांनी केला आहे. त्यामुळे खासदार संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आता अब्रुनुकसानीचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे आता याप्रकरणी काय निकाल लागणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.