मुंबईः नागपुरात समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीवर थाप मारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतूक केले होते. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमत्र्यांच्या पाठीवर फक्त हिंदुत्व आणि शिवसेना सोडली म्हणून थाप मारली असल्याची टीका त्यांनी केली होती. त्यामुळे शिंदे गटाचे नेत्यांनी पलटवार करत पुन्हा संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
आमदार संजय गायकवाड यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना त्यांनी अरेतुरेची भाषा करत खरी शिवसेना तुम्ही संपवली आहात असा जोरदार निशाणाही साधण्यात आला आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यानंतर शिंदे गटातील आमदारांनी खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. संजय राऊत यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, एकनाथ शिंदे हे तुझ्या शिवसेनेच्या प्रवेशापासूनच्या आधीपासूनचे शिवसैनिक असल्याचा टोला त्यांनी लगावला.
काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाबरोबर शिवसेनेने युती केल्यामुळे तुम्ही शिवसेनेच्या आणि हिंदुत्वाच्या पाठीत खंजीर खुपसला आहात अशी जाहीर टीकाही आमदार संजय गायकवाड यांनी केली.
यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचा विश्वासघात आम्ही केला आहे असं वक्तव्य करणाऱ्यांना उत्तर देताना ते म्हणाली की, बाळासाहेब ठाकरे यांचे स्थान आमच्या हृदयात आहेत.
त्यांच्या एका शब्दावर आपण आमचा जीव गहाण ठेवत होतो. त्यामुळे आम्ही मरेपर्यंत त्यांच्या नावाने भावूक होणारच असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला.
यावेळी खासदार संजय राऊत यांच्यावर आमदार गायकवाड यांनी टीका करताना अरेतुरेच्या भाषेत सांगितले की, संजय राऊत तू त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नादी लागून शंभर टक्के संपवून तू बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे अशी सडकून टीकाही त्यांच्यावर करण्यात आली.
बाळासाहेबाचे विचार हे हिंदुत्वाचे होते, ते काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जाण्याचे कधीच नव्हते म्हणून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला नाही तर तुम्ही लोकांनी हिंदुत्वाच्या पाठीत खंजीर खुपसला अशी जोरदार टीका त्यांच्यावर करण्यात आली आहे.