मुंबईः हिवाळी अधिवेशनाच्या आधी महाविकास आघाडी आणि त्यांच्या मित्र पक्षांनी एकत्र येत मुंबईमध्ये महामोर्चा काढला होता. त्यानंतर या महामोर्चावर सत्ताधाऱ्यांकडून हा महामोर्चा नव्हता तर तो नॅनो मोर्चा होता अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांनी केली. त्यांना प्रत्युत्तर देताना खासदार संजय राऊत यांनी मराठा क्रांती मोर्चाचे व्हिडीओ ट्विट केले होते. मात्र त्या ट्विटमुळेच आता संजय राऊत अडचणीत आल्याचे दिसत आहे.
ज्या मराठी क्रांती मोर्चाचे व्हिडीओ संजय राऊत यांनी ट्विट केले आहेत, त्या मोर्चाला संजय राऊत यांनी हिणवले होते. त्या मोर्चाला त्यांनी मुका मोर्चा म्हणून संबोधले होते. त्यामुळे संजय राऊत यांनी मराठा समाजाची माफी मागावी अशी मागणी होत आहे.
यावर शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी बोलताना म्हटले आहे की, पाच-सहा पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडीने महामोर्चा काढला आहे.
मात्र हा मोर्चा फक्त महामोर्चा आहे हे दाखवण्याचाच प्रयत्न महाविकास आघाडीने केला आहे. तर हा महामोर्चा नव्हता तर तो नॅनो मोर्चा होता अशी टीका प्रतापराव जाधव यांनी केली आहे.
खासदार संजय राऊत यांनी अगदी मराठा क्रांती मोर्चा निघाल्यापासून त्या मोर्चाला त्यांनी हिणवले होते. त्याच मराठा मोर्चाचे संजय राऊत यांनी व्हिडीओ आता आपल्या महामोर्चाचे व्हिडीओ असल्याचे सांगत ते व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यामुळे त्यांनी मराठा समाजाची माफी मागावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.
मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी म्हणून मराठा क्रांती मोर्चा निघाला होता. त्यामुळे मराठा समाजाला फायदाच झाला होता. मात्र त्या मोर्चाला खासदार संजय राऊत यांनी मूका मोर्चा म्हणून संबोधले होते.
त्यामुळे त्यांना आता त्या मोर्चाचे व्हिडीओ ट्विट करताना लाज वाटत नाही का असा सवालही खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे. त्यामुळे महामोर्चा निघाल्यापासून विरोधकांना संजय राऊत यांना लक्ष्य केले आहे.