MPSC Updates: आयोग म्हणते न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतर परीक्षेचे तारीख निश्चित; तर उमेदवार म्हणतात आयोगाने आत्मपरीक्षण करावे

| Updated on: Apr 18, 2022 | 7:13 AM

आयोगालाच परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे की, तुमच्या अधिकारात तुम्ही परीक्षा घ्या उद्या कोणीही तक्रार करु शकेल आणि कोणीही परीक्षा थांबवू शकेल त्याचा त्रास परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार असल्याचे मत व्यक्त केले गेले आहे.

MPSC Updates: आयोग म्हणते न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतर परीक्षेचे तारीख निश्चित; तर उमेदवार म्हणतात आयोगाने आत्मपरीक्षण करावे
न्यायालयीन निर्णयानंतर MPSC निर्णय घेणार
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबईः महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब (Non-Gazetted, Group B) मुख्य परीक्षा 2020 संदर्भात दाखल सर्व न्यायालयीन प्रकरणी अंतिम निर्णय झाल्यानंतर परीक्षेची तारीख (Exam Dates) निश्चित करण्यात येईल असे आयोगातर्फे जाहीर करण्यात आले आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षेंची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे आयोगाने हा निर्णय ट्विविट केल्यानंतर युजर्सनी अनेक प्रश्न विचारले गेले आहेत. त्यामुळे आयोगालाच परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे की, तुमच्या अधिकारात तुम्ही परीक्षा घ्या उद्या कोणीही तक्रार करु शकेल आणि कोणीही परीक्षा थांबवू शकेल त्याचा त्रास परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार असल्याचे मत व्यक्त केले गेले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने हा निर्णय घेतला असला तरी कोरोना, मराठा आरक्षण आणि न्यायालयीन प्रकरणांमुळे परीक्षांचे वेळापत्रक प्रत्येक वेळी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी मानसिक ताणतणावत जगत आहेत.


नोकरभरती लटकली

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या निर्णयामुळे नोकरभरती लांबली असून त्यामुळे स्पर्धा परीक्षांचे तयारी करणाऱ्या उमेदवारांचे नुकसान होत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ट्विटर हँडलवरुन सर्व न्यायालयीन प्रकरणी अंतिम निर्णय झाल्यानंतर परीक्षेची तारीख निश्चित केले जाणार असे सांगण्यात आले आहे. एमपीएससीच्या या पोस्टवर तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जाहिरात कधी येणार, नवी जाहिरात देणार का असे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.


परीक्षा झाली नाही तर भरती नाही

आयोगाच्या वेगवेगळ्या निर्णयामुळे खरा फटका बसत आहे तो परीक्षार्थींना अशा अनेक निर्णयामुळे अनेकाचे नुकसान झाले असल्याची प्रतिक्रियाही ट्विटरवरुन दिल्या गेल्या आहेत. अनेक विद्यार्थींनी तात्काळ नवी जाहिरात काढावी अशीही मागणी केली आहे.

रोजगाराची संधी उपलब्ध नाही

कोरोना महामारीनंतर बेरोजगाराच्या आकाड्यात प्रचंड वाढ झाली होती, त्यामुळे खासगी क्षेत्रापेक्षा सरकारी नोकरी करण्याकडे अनेकांचा कल पूर्वीपेक्षाही आता वाढला आहे. त्यामुळे आयोगानेही याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी इच्छा व्यक्त केली आहे.

महावितरणाच्या वर्ग चारच्या 2 हजार कधी भरणार?

महावितरणाकडूनही सुमारे दोन हजार जागांची सुरु झालेली भरती प्रक्रिया वेगवेगळ्या कारणामुळे थांबली आहे. त्यामुळे निवड होऊनही उमेदवारांना नोकरी मिळाली नाही.

यंत्रणेवरचा ताण वाढणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे आजच नाही तर गेल्या कित्येक वर्षापासून अनेक तक्रारी दाखल होत असतात. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या भरती प्रक्रियांना विलंब होत आला आहे. आयोगाच्या या पोस्टवर अनेकांनी नाराजी व्यक्त करत आयोगाच्या निर्णयाचा आम्हाला त्रास होत असून त्याचा विचार केला जावा अशी इच्छाही व्यक्त केली गेली आहे.

आयोगाने आत्मपरीक्षण करावे

आयोगाने परीक्षा संदर्भात पोस्ट केल्यानंतर ट्विटरवरुन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला अनेक प्रश्न विचारले गेले आहेत. अक्षय वारे यांनी आयोगाने किती परीक्षांचे निकाल अजून न्यायालयात आहेत आणि त्यामागची कारणे काय आहेत याचे आत्मपरीक्षण करावे अशी सूचना देऊन उमेदवारांचा मानसिक ताण खूप वाढत असल्याचे सांगितले आहे. तसेच प्रामाणिक अभ्यास करणारे उमेदवार नाहक भरडले जात असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या

Raj Thackeray : राज ठाकरेंना इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटेंचं आव्हान, आपल्या वर्गाला बसण्याचाही सल्ला!

Raj Thackeray : शरद पवारांवर नास्तिकतेचा आरोप करणारे राज ठाकरेच नास्तिक? व्हायरल पोस्ट आणि त्यामागील सत्य

Bank Opening Time: देशातील बँका आता एका तास आधीच सुरु होणार; सोमवारपासून 9 वाजता व्यवहार सुरु