anant ambani
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी आपला धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या लग्नासाठी कुटुंबासह लग्नस्थळी पोहोचले आहेत. जिथून लग्नाच्या मिरवणुकीची पहिली झलकही समोर आली आहे. या फोटोंमध्ये पुन्हा एकदा अंबानी कुटुंब रॉयल लूकमध्ये दिसले. अनंत अंबानी आपल्या संपूर्ण कुटुंबासह जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पोहोचले आहेत. जिथे प्रत्येकाने आत जाण्यापूर्वी पापाराझींना अनेक पोज दिल्या. यावेळी वर अनंत अंबानी याचे आई वडील दोघेही रॉयल लूकमध्ये दिसले. या लग्नात आधुनिकतेची झलक दिसत असली तरी परंपरांपासूनही ते दूर राहिलेले नाही. नीता अंबानी यांच्या आई पूर्णिमा दलाल आणि त्यांची बहीण ममता दलाल या लग्नासाठी उपस्थित आहेत.
-
-
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये विवाह होत आहे. यासाठी वरराजा अनंत आपल्या कुटुंबासह लग्नस्थळी पोहोचला आहे.
-
-
अनंत अंबानी आपल्या संपूर्ण कुटुंबासह जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पोहोचले आहेत. जिथे प्रत्येकाने आत जाण्यापूर्वी पापाराझींना अनेक पोज दिल्या.
-
-
या चित्रांमध्ये राधिका मर्चंटचा भावी पती अनंत अंबानी सोनेरी रंगाच्या बंद गळ्यातील शेरवानीमध्ये दिसत आहे.
-
-
वराचे आई वडीलही रॉयल लूकमध्ये दिसले. मुकेश अंबानी यांनी गुलाबी रंगाची शेरवानी घातली आहे आणि नीता अंबानी यांनी त्यांच्या मुलाशी जुळणारा हेवी गोल्डन रंगाचा लेहेंगा घातला आहे.
-
-
या फोटोंमध्ये अंबानी कुटुंबाची मोठा मुलगा आकाशा अंबानी याने पीच शेडची शेरवानी परिधान केली आहे. तर त्याची पत्नी श्लोका हिने डायमंड वर्क असलेला गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे ज्यात तिने सोनेरी दुपट्टा घातला आहे
-
-
मुकेश अंबानी यांची लाडकी मुलगी आणि राधिका मर्चंटची वहिनी ईशा अंबानी ही गुलाबी आणि पिवळ्या रंगाच्या लेहेंग्यात दिसली होती. तिने तिच्या गळ्यात एक मोठा डायमंड सेट घातला आहे.
-
-
अंबानी कुटुंबाचे जावई आणि ईशा अंबानीचे पती आनंद पिरामल हे छायाचित्रांमध्ये पत्नीसोबत शेरवानी मॅच करताना दिसले.