सध्या देशात लोकसभा निवडणुका होत आहेत. अशात जाहीक सभांचा धडाका सुरु आहे. ठिक-ठिकाणी प्रचार सभा होत आहेत. आरोप- प्रत्यारोपांच्या उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोकदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा फडतूणवीस असा उल्लेख केला. यावरून भाजपने उद्धव ठाकरेंवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय. उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन ढासळलं आहे. मानसिक वैफल्यातून केलेलं हे भाष्य आहे. त्यांनी हे विसरू नये, त्यांच्या नावाचाही अपभ्रंश होऊ शकतो. आमच्यावर संस्कार आहेत अन्यथा आम्ही उठाबशा कशा काढायच्या हे सांगू शकतो, असं आशिष शेलार म्हणालेत.
इतका पळपुता माणूस पाहिला नाही. आधी ईव्हीएम मग मतदान टक्केवारी आता बोटाच्या शाईवर बोलतायेत. पराभव दिसू लागलाय म्हणून बेछूट आरोप करत आहेत, असं म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांची टोपी फिट बसली आहे, ते बोललेत. संघाच्या टोपीवर उद्धव जी तुम्ही टीका केलीय. मत मिळवण्याचा प्रयत्न करत आहात. उद्धव ठाकरे काँग्रेसच्या जाहीरनाम्याला पाठिंबा देत आहेत. म्हणजे त्यांना माओवादी जाहीरनामा मान्य आहे. जनता हे माफ करणार नाही, असं आशिष शेलार म्हणालेत.
इंडिया आघाडी पत्रकार परिषदेवर आशिष शेलारांनी टीका केली आहे. भ्रम निर्माण कोण करत आहे? पूर्ण निवडणुकीत भ्रम निर्माण करण्याची फॅक्ट्री महाविकास आघाडीची आहे. आरक्षण बदलणार कोणी म्हटलं कधी मोदींनी म्हटलं का? आमच्या जाहीरनाम्यात नाही. मग हे भ्रम उद्धव ठाकरे की शरद पवारसाहेब पसरवत आहेत?, असा सवाल आशिष शेलारांनी केला आहे.
आशिष शेलार यांनी विरोधकांवर टीका केली आहे. जे. पी. नड्डा म्हणाले की, आम्ही वैचारिक रित्या एकच आहोत. संघ, परिवार, भाजप एकाच मार्गावर चालत आहेत. आमचं रूप मोठं झालंय म्हणून विरोधकांच्या डोक्यावर परिणाम झालाय, असं म्हणत आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.