मुंबई : मुंबईतील कुर्ला नेहरुनगर धम्म सोसायटीमध्ये पार्किंगमध्ये असलेल्या 20 ते 25 दुचाक्यांमध्ये अचानक भीषण आग लागली. या आगीत सर्व दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. ही आघ नेमकी कशामुळे लागली याचं कारण अज्ञाप कळू शकलेलं नाही.
कुर्ला नेहरुनगर येथे पार्किंगमध्ये उभी असलेल्या बाईकमध्ये अचानक आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 16 फायर इंजिन 18 वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा सुरु केला आहे. ही आग नेमकी कशी लागली, कशामुळे लागली याचं कारण अज्ञापही गुलदस्त्यात आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर टेम्पोला आग
मुबंई-पुणे एक्सप्रेस-वेवर एका आयशर टेम्पो अचानक पेट घेतला. या घटनेत एका व्यक्तीचा दुर्दैवी अंत झाला. एक्सप्रेस-वेवरील रसायनी पोलीस स्टेशन हद्दीत मुबंईहुन पुण्याकडे जाणाऱ्या आयशर टेम्पो काही कारणांमुळे बदं पडला होता. त्या टेम्पोला पेट्रोलिगं टिमने एका बाजुला करुन बँरिगेट्स लावले. त्यानतंर काही वेळाने या टेम्पोने अचानक पेट घेतला. त्या आगीमध्ये टेम्पोच्या केबीन मधील एक व्यक्तीचा मृत्यू झाला. मृतदेहाला टेम्पोतून काढून खालापूर तालुक्यातील चौक ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.
मध्यरात्रीच्या दरम्यान लागलेल्या या आगीमध्ये आयशर टेम्पो पूर्णपणे जळून खाक झाला आहे. खोपोली अग्नीशमन दल, सिडको अग्निशमन दल, रिलायन्स अग्नीशमन दलाने आगीवर नियत्रंण मिळवले. पण, या दरम्यान मुबंईहुन पुण्याकडे जाणारी वाहतूक रोखुन धरण्यात आल्याने दोन किमीपर्यंत वाहनाच्यां रांगा लागल्या होत्या.
देवदुत टिम, आय आर बी यत्रंणा, डेल्टा फोर्स, वाहतुक पोलीस पळस्पे, रसायनी पोलीस स्टेशन, अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक यत्रंणा चे टिम सदस्याने दोन तासाच्या प्रयत्नानतंर आगीवर नियत्रंण मिळवुन पुन्हा वाहतुक सुरळीत केली.
मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर टेम्पोने पेट घेतला, एकाचा मृत्यूhttps://t.co/UceVD3eiHK#Fire #Raigad #TEMPO #mumbaipuneexpressway
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 13, 2021
संबंधित बातम्या :
राज्यात चार आगीच्या घटना, कुठे ट्रक पेटला, तर कुठे दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी
औरंगाबादच्या गंगापूररोडवर ट्रकला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी टळली