मुंबई : अवघ्या दोन दिवसांपूर्वी चेंबूर-वाशीनाका येथे डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांच्या घरावर दरड कोसळल्याने 18 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंबईतील जवळपास 50 हजार नागरिक हे दरडीच्या छायेत वास्तव्य करत आहेत. मुंबई शहरासह उपनगरातील 24 वॉर्डपैकी 21 वॉर्डमध्ये 291 ठिकाणी दरड कोसळण्याची घटना घडली आहे. त्यामुळे अनेक कुटुंब जीवमुठीत घेऊन डोंगराळ भागात राहत आहेत. (Mumbai 291 landslides in 21 wards Dangerous ward in mumbai)
मुंबईतील 24 वॉर्डपैकी 21 वॉर्डमध्ये 291 ठिकाणी दरड कोसळण्याची घटना घडली आहे. सध्या मुंबईतील भांडुप, विक्रोळी, साकीनाका, कुर्ला, मलबार हिल या ठिकाणी नेहमीच दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यात भांडुप, विक्रोळी आणि घाटकोपर या ठिकाणी सर्वाधिक दरडी कोसळल्या आहेत.
धोकादायक विभाग आणि दरडीची ठिकाणे
भांडुप एस – 152
घाटकोपर एन – 32
कुर्ला एल – 18
ग्रँडरोड , डी विभाग – 16
मालाड पी उत्तर – 11
चेंबूर एम पूर्व – 11
वरळी जी दक्षिण 10
मुंबईतील धोकादायक ठिकाणी असलेल्या वस्त्यांचा आढावा घ्या
दरम्यान मुंबईत वाढत्या दरडी कोसळण्याच्या घटनांवरुन अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी मुंबईतील धोकादायक ठिकाणी असलेल्या वस्त्यांचा आढावा घ्या, असे निर्देश महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.
मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये धोकादायक ठरु शकतील अशा जागी जर वस्ती असेल तर त्यांना तोंडी आणि लेखी नोटीसा देण्याचे काम पालिकेकडून सुरु आहे. मुंबईत मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून लवकरात लवकर अशा वस्त्यांमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवावे, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
तसेच गरजेनुसार तात्पुरत्या स्वरुपात किंवा कायमस्वरुपी धोकादायक जागांवरुन वस्ती स्थलांतरित करण्याबाबत पालिकेकडून लवकरच कार्यवाही केली जाणार आहे.
मुंबईत समुद्रात सकाळी 10 वाजता हायटाईड, पालिकेची यंत्रणा सतर्क https://t.co/ljXx9EWEjq #Mumbai #Sea #rains
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 21, 2021
(Mumbai 291 landslides in 21 wards Dangerous ward in mumbai)
संबंधित बातम्या :
Mumbai Rain | कुठे भिंत कोसळली, तर कुठे दरड कोसळली, मुंबईत तीन दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू
Mumbai Rain | मुंबईतील दरडी जीवघेण्या, 29 वर्षात 290 लोकांनी प्राण गमावल