मुंबई : राज्यासह मुंबईत जोरदार बरसणाऱ्या पावसाने आज सकाळपासून थोडी विश्रांती घेतली आहे. मुंबईत गेले दोन दिवस धुवाँधार बरसणाऱ्या पावसाने धुमाकूळ घातला. जोरदार पावसामुळे मुंबईसह इतर सखल भागात अनेक ठिकाणी पाणी साचलं होते. या पावसाचा फटका मुंबईच्या वाहतुकीवरही पडला होता. पावसाचा जोर पाहता प्रशासनाने मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या तीन जिल्ह्यात काल (2 जुलै) सुट्ट्या जाहीर केल्या होत्या. पावसाचा जोर आज ओसरलेला दिसत आहे. आज सकाळपासून मुंबईकर चाकरमणी घरातून ऑफिसला जाण्यासाठी निघाला आहे. मध्य रेल्वेने रविवारच्या मेगाब्लॉकप्रमाणे लोकलचं वेळापत्रक तयार केल्याने, आजही प्रवाशांना मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे.
LIVE UPDATE
[svt-event title=”मध्य रेल्वेकडून रविवारचं वेळापत्रक रद्द” date=”03/07/2019,12:19PM” class=”svt-cd-green” ] अखेर मध्ये रेल्वेकडून रविवारचं वेळापत्रक रद्द, आता सर्व लोकल नियमित वेळेनुसार धावणार, प्रवाशांचे हाल झाल्यानंतर रेल्वेला जाग [/svt-event]
[svt-event title=”गर्दीमुळे रेल्वेतून तीन प्रवासी पडले” date=”03/07/2019,12:15PM” class=”svt-cd-green” ]
#BREAKING : रेल्वेची गर्दी प्रवाशांच्या जीवावर बेतली आहे, मुंब्रा कळवा दरम्यान 3 प्रवासी पडले, 2 पुरुष तर एक महिला जख्मी, नाजिमा शेख असं महिलेचं नाव, तीघांवरही कळव्याच्या शिवाजी हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरु
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 3, 2019
[svt-event title=”कांदिवलीतील गटारत गाय पडली” date=”03/07/2019,11:32AM” class=”svt-cd-green” ]
#मुंबई : कांदिवलीच्या मॅनहोल गटारात गाय पडली, अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर गायीला बाहेर काढण्यात यश pic.twitter.com/qgFl70oCQ5
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 3, 2019
[svt-event title=”घाटकोपर स्टेशनवर महिला बेशुद्ध” date=”03/07/2019,11:08AM” class=”svt-cd-green” ] घाटकोपर रेल्वे स्टेशनवर गर्दीमुळे महिला बेशुद्ध, राजावाडी रुग्णालयात दाखल [/svt-event]
[svt-event title=”मध्य रेल्वेवर प्रत्येक स्टेशनवर गर्दी ” date=”03/07/2019,11:07AM” class=”svt-cd-green” ] मुंबईतील मध्य रेल्वेवर प्रत्येक स्टेशनवर गर्दी होत आहे. [/svt-event]
[svt-event title=”मालेगावात दोन भावंडे नाल्यातून वाहून गेले” date=”03/07/2019,10:31AM” class=”svt-cd-green” ] मालेगाव तालुक्यातील वाघी येथील शाळेतून घरी येत असताना नाल्याच्या पुरात दोन बहीण भाऊ वाहून गेले. काल ही घटना घडली. त्यांचा शोध अजूनही सुरुच आहे. कु.पुजा बाळू पवार वय 14 आणि पारस बाळू पवार वय 8 अशी या भावंडांची नावं आहेत. काल रात्रीपासून या दोघांचा शोध सुरूच आहे. आज सकाळीच सहा वाजल्यापासून संत गाडगेबाबा आपत्कालीन बचाव पथकाच्या टीमने पुन्हा शोधकार्य सुरु केले. मात्र नाल्याच्या बाजूलाच एक नदी असल्याने तसेच जागोजागी जेसीबीने केलेले खड्डे आणि मोठया प्रमाणात झाडे झुडपे असल्याने शोध मोहिमेला अडथळे निर्माण होत आहेत. [/svt-event]
[svt-event title=”विक्रोळी स्टेशनवर गर्दी” date=”03/07/2019,10:30AM” class=”svt-cd-green” ]
#मुंबई लोकल अपडेट – मध्य रेल्वेवर प्रत्येक स्टेशनवर तुफान गर्दी, लोकल उशिरा, विक्रोळी स्टेशनवरील सद्यस्थिती @Central_Railway pic.twitter.com/AusKLGQ7mt
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 3, 2019
[svt-event title=”मध्य रेल्वे रविवारच्या वेळेनुसार धावत असल्याने दिवा स्टेशनवर प्रचंड प्रमाणात गर्दी” date=”03/07/2019,9:27AM” class=”svt-cd-green” ]
LIVE : मध्य रेल्वे रविवारच्या वेळेनुसार धावत असल्याने दिवा स्टेशनवर प्रचंड प्रमाणात गर्दी, चेंगराचेंगरी होण्याची शक्यताhttps://t.co/8gdYc6AstK @Central_Railway @drmmumbaicr pic.twitter.com/LtBoWRallh
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 3, 2019
[svt-event title=”वसईत पावसाची विश्रांती” date=”03/07/2019,9:25AM” class=”svt-cd-green” ] वसई : वसई विरारमध्ये पावसाची विश्रांती, मुख्य रस्त्यावरील सकल भागातले पाणी ओसरले [/svt-event]
[svt-event title=”मालाड दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला” date=”03/07/2019,8:26AM” class=”svt-cd-green” ] मालाड दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला, आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू, बचावकार्यात तीन मृतदेह बाहेर काढण्यात यश [/svt-event]
[svt-event title=”मध्य रेल्वे आज रविवारच्या वेळापत्रकानुसार धावणार” date=”03/07/2019,8:19AM” class=”svt-cd-green” ]
#LIVE : मध्य रेल्वे आज रविवारच्या वेळापत्रकानुसार धावणार, काल झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक एक्सप्रेसचे मार्ग बदलले, तर काही एक्सप्रेस गाड्या रद्द, मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत, चाकरमान्यांना दिलासाhttps://t.co/8gdYc6S3li
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 3, 2019
[svt-event title=”रत्नागिरीतील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटलं, दोन जणांचा मृत्यू, 22 हून अधिक बेपत्ता” date=”03/07/2019,8:14AM” class=”svt-cd-green” ]
#LIVE : रत्नागिरीतील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटलं, दोन जणांचा मृत्यू, 22 हून अधिक बेपत्ता, धरण फुटल्यामुळे यामुळे तिवरे बेंडवाडीत पूरसदृश परिस्थिती#MumbaiRainlive #Maharashtra pic.twitter.com/MGCAZ0wcBx
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 3, 2019