बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि शाहरूख खान या दोघांना वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. यावर मुंबईतील वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वांद्रे भागात बरेचसे सेलिब्रिटी राहतात. त्यामुळे या सगळ्या सेलिब्रिटीसाठी आम्ही आमच्या छातीचा कोट करू. भविष्यामध्ये अशा कुठल्याही धमकीच्या घटना घडणार नाही. यासाठी मुंबई पोलीस आणि त्यासोबतच वांद्रे पश्चिममधील जनता सलमान खान यांच्यासोबत कायम उभी असेल. हा सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान आणि इतर महत्त्वाचे सेलिब्रिटी परिसरामध्ये राहतात. अत्यंत महत्त्वाचा असा हा मुंबईचा परिसर आहे आणि हा परिसर सुरक्षित रहावा हे फार मोठा आव्हान आहे. पण तरीदेखील त्यांची सुरक्षा ही आमची जबाबदारी आहे, असं आशिष शेलार म्हणालेत.
केवळ सलमान खानच नाही तर शाहरुख खान आणि सलीम खान इतर सगळे महत्त्वाचे सेलिब्रिटी इथे राहतात आणि त्यांच्या सगळ्यांची सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे आणि आमच्या सरकार आल्यानंतर आम्ही वाटेल ती सुरक्षा त्यांना द्यायला तयार आहोत आणि काही झालं तरी त्यांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे राहू.भविष्यामध्ये महायुतीकडून ही जबाबदारी पार पाडेल जाईल असा विश्वास मला आहे, असं शेलारांनी म्हटलं आहे.
अभिनेता शाहरुख खानला फोन करून 50 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या व्यक्तीला छत्तीसगडमध्ये अटक झाली आहे. शाहरुख खान धमकी देणाऱ्या वकील फैजान खानला पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. सलमान खानला देखील वारंवार जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे. यावर आशिष शेलार यांनी भाष्य केलं आहे.
वांद्रे पश्चिम विधानसभेतील जनता यंदाही मला आशीर्वाद देईल असा मला ठाम विश्वास आहे. महाविकास आघाडीच्या खोट्या भुलथापांना बांद्रातील जनता बळी पडणार नाही. वांद्रे पश्चिममधील मोठमोठे विकास काम सध्या आम्ही मार्गी लावतोय. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आज मी सकाळी ट्विट केलंय ते तंतोतंत खरं आहे. प्रत्येक निवडणुकीत मुद्दे वेगळे तीन पक्ष मिळून हलवण्याचा प्रयत्न पण आम्ही जिंकणारच, वांद्र्याचा विजय म्हणजे आशिष शेलार यांचा विजय, असं म्हणत आशिष शेलार यांनी विधानसभा निवडणूक जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला.