Mumbai BEST Service: मुंबईतील बेस्ट बसेसच तिकीट खरेदी करा तुमच्या मोबाईलमधून, जाणून संपूर्ण माहिती एका क्लिकवर

| Updated on: Aug 08, 2022 | 7:48 AM

प्रवासी आता युपीआय, नेट बँकिंग, डेबिट आणि क्रेडिट कार्ड आणि इतर ऑनलाइन पेमेंट वापरून मोबाइल वॉलेट रिचार्ज करू शकतात आणि नंतर त्यांच्या बस तिकिटांसाठी त्वरित पेमेंटसाठी वॉलेट शिल्लक वापरू शकतात.

Mumbai BEST Service: मुंबईतील बेस्ट बसेसच तिकीट खरेदी करा तुमच्या मोबाईलमधून, जाणून संपूर्ण माहिती एका क्लिकवर
काल बसचा स्थापना दिवस होता
Image Credit source: sabrangindia.in
Follow us on

मुंबई : देशातील दिवसेंदिवस वाढत्या गतीने मुंबईची (Mumbai) जीवनवाहिनी म्हटल्या जाणाऱ्या बेस्ट (BEST) बसेसचेही डिजिटलायझेशन होत आहे. सर्वप्रथम या बसेसमधील तिकीट खरेदीची पद्धत बदलण्यात आली आहे. आता बेस्ट बसमधून प्रवास करताना पूर्वीप्रमाणे तिकीट काढावे लागणार नाही. मुंबईतील दैनंदिन प्रवाशांसाठी ‘चलो पे'(Chalo Pay) सेवा सुरू करून बेस्टने रविवारी आपला स्थापना दिन साजरा केला. आता, प्रवाशांना बसमध्ये चढण्यापूर्वी मोबाइल तिकीट खरेदी करण्याची आवश्यकता नाही. ते कोणत्याही बसमध्ये चढू शकतात आणि त्यांच्या मोबाइलने पैसे देऊ शकतात आणि पैसे भरल्यावर त्यांचे मोबाइल तिकीट तयार केले जाईल. त्याचबरोबर “ही भारतातील पहिली सार्वजनिक वाहतूक केंद्रीत पैसे भरण्याची कार्य पद्धती आहे. चलो पे नावाचे, हे वैशिष्ट्य बेस्ट चलो अॅपवर उपलब्ध आहे. ही एक ऑफलाइन पेमेंट प्रणाली आहे. ज्यामुळे अनेक प्रवाशांना फायदा होईल,” असं वेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांनी सांगितले.

पेमेंट यशस्वी झाल्यानंतर…

प्रवासी आता युपीआय, नेट बँकिंग, डेबिट आणि क्रेडिट कार्ड आणि इतर ऑनलाइन पेमेंट वापरून मोबाइल वॉलेट रिचार्ज करू शकतात आणि नंतर त्यांच्या बस तिकिटांसाठी त्वरित पेमेंटसाठी वॉलेट शिल्लक वापरू शकतात. त्यांना फक्त बस वाहकाला त्याची माहिती द्यावी लागणार आहे. प्रवाशाने त्याचा फोन कंडक्टरच्या तिकीट मशीनजवळ धरून ठेवावा किंवा त्यांच्या तिकिटाचे पैसे देण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करा. पेमेंट यशस्वी झाल्यानंतर, काही मिनिटांत मोबाइल तिकीट तुमच्या अॅपवर दिसेल असं लोकेश चंद्रा यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

काल बसचा स्थापना दिवस होता

काल बसचा स्थापना दिवस होता. तो काल बसच्या कर्मचाऱ्यांनी अतिशय उत्साहात साजरा केला. नगरपालिकेच्या 75 वर्षांचा एक भाग म्हणून, बेस्टच्या जीएमने बेस्टच्या इतिहासावरील मिनी म्युझियम आणि एका विशेष रांगोळी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. दोन्ही कार्यक्रम पाहण्यासाठी सोमवारी सकाळी 11 ते संध्याकाळी 7 या वेळेत प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यला भेट द्यावी.