मुंबईत विनामास्क फिरणाऱ्यांवर मोठी कारवाई, आतापर्यंत वसूल केलेल्या दंडाची रक्कम चक्रावून टाकणारी

| Updated on: Sep 27, 2021 | 9:08 AM

मुंबईत मास्कच्या कारवाईला वेग आला आहे. दररोज जवळपास 10 हजार नागरिकांवर कारवाई केली जात आहे. मास्क न घालणाऱ्या दररोज 10 हजार लोकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यातून दिवसाला लाखो रुपयांचा दंड वसूल केला जात आहे.

मुंबईत विनामास्क फिरणाऱ्यांवर मोठी कारवाई, आतापर्यंत वसूल केलेल्या दंडाची रक्कम चक्रावून टाकणारी
मास्क
Follow us on

मुंबई : मुंबईत मास्कच्या कारवाईला वेग आला आहे. दररोज जवळपास 10 हजार नागरिकांवर कारवाई केली जात आहे. मास्क न घालणाऱ्या दररोज 10 हजार लोकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यातून दिवसाला लाखो रुपयांचा दंड वसूल केला जात आहे. गेल्या महिन्यात दररोज 5000 लोकांवर कारवाई होत होती , आता सर्व अनलॉक झाल्यावर दहा हजार नागरिकांवर कारवाई होत आहे. आतापर्यंत 34 लाख नागरिकांवर कारवाई झाली असून, तब्बल 60 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

मुंबईत रस्त्यावर फिरणाऱ्यांच्या तोंडावर जर मास्क नसेल तर तातडीने पावती फाडून दंडात्मक कारवाई केली जाते. घराबाहेर वावरताना मास्क घालणे बंधनकारक आहे. मात्र तरीही काही लोक विनामास्क फिरताना दिसतात. पण अशा लोकांवर पालिकेचे कर्मचारी किंवा क्लीनअप मार्शल्सकडून कारवाई केली जाते.

कोरोना रुग्णसंख्येत घट

राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होत आहे. राज्यात कोरोनाबाधित मृतांच्या संख्येतही मोठी घट झाली आहे. शनिवारी 25 सप्टेंबरला 58 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता. आता काल म्हणजे रविवारी 26 सप्टेंबरला 36 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे दैनंदिन रुग्णसंख्येतही घट झाली आहे.

दिलासादायक चित्र

शिवाय कालच्या तुलनेत एकूण सक्रिय रुग्णांची संख्याही घटल्याने, राज्यातील आजची कोरोनास्थिती दिलासादायक आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार काल दिवसभरात राज्यात 3 हजार 206 इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. परवा म्हणजे शनिवारी ही संख्या 3 हजार 276 इतकी होती. तर काल रविवारी दिवसभरात एकूण 3 हजार 292 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

काल राज्यात झालेल्या 36 रुग्णांच्या मृत्यूनंतर राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्क्यांवरच स्थिर आहे. याबरोबरच राज्यात एकूण 63 लाख 64 हजार 27 रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.24 टक्के इतके झाले आहे.

संबंधित बातम्या  

Pune Corona | पुण्यात रेकॉर्डब्रेक कमाई, विनामास्क फिरणाऱ्यांकडून तब्बल 45 कोटी रुपये वसूल

गणेशोत्सवाच्या काळात मास्क न घालण्याची चूक पडेल महागात; वाचा मुंबई पोलिसांचा अ‍ॅक्शन प्लॅन