मुंबई महापालिकेची ‘सॅप’ प्रणाली गुरुवारपर्यंत बंद, नागरी सुविधा केंद्रांमधील सेवा खंडित

| Updated on: Nov 22, 2020 | 7:57 AM

मुंबई महापालिकेची सॅप प्रणाली अद्ययावत करण्याच्या कामांसाठी 26 नोव्हेंबर 2020 पर्यंत बंद असणार आहे.(Mumbai BMC SAP Software System will be closed)

मुंबई महापालिकेची ‘सॅप’ प्रणाली गुरुवारपर्यंत बंद, नागरी सुविधा केंद्रांमधील सेवा खंडित
Follow us on

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेची सॅप प्रणाली अद्ययावत करण्याच्या कामांसाठी पुढील चार दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. येत्या 26 नोव्हेंबरपर्यंत पालिकेची ही सॅप प्रणाली बंद ठेवली जाणार आहे. त्यामुळे पालिकेकडून नागरी सुविधा केंद्रांमधील सेवा, निविदा भरणे किंवा कार्यादेश देणे, अधिदान करणे इत्यादी काम करता येणार नाही. (Mumbai BMC SAP Software System will be closed)

मुंबई महापालिकेची सॅप प्रणाली अद्ययावत करण्याच्या कामांसाठी 26 नोव्हेंबर 2020 पर्यंत बंद असणार आहे. मुंबईकरांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी मुंबई महापालिकेकडून उपयोगात येणाऱ्या ‘सॅप’ संगणकीय प्रणालीचे अद्ययावतीकरण करण्याचे काम 13 नोव्हेंबर 2020 पासून सुरू आहे. हे काम येत्या 26 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

बृहन्मुंबई महापालिकेकडून नागरिकांना अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सर्वोत्तम आणि तत्पर सेवा देत आहे. सॅप या मूलभूत सॉफ्टवेअर प्रणालीचा उपयोग करुन मुंबईकर नागरिक, कंत्राटदार तसेच महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी यांच्याशी निगडित प्रशासकीय कामकाजाच्या विविध गरजा पूर्ण करण्यात येत असतात.

सॅप प्रणालीमध्ये नवीन वैशिष्ट्ये समाविष्ट करुन ती अद्ययावत करण्यात येणार आहे. यामुळे सर्वोत्तम सेवा देण्यासह सॅप प्रणाली अधिक सुरक्षित होणार आहे. ही अद्ययावत, वैशिष्ट्यपूर्ण सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी, सध्या कार्यान्वित असलेल्या सॅप प्रणालीचे सर्व्हर्स बंद करावे लागणार आहे. त्यानंतर त्याचे अद्ययावतीकरण करण्यात येत आहे.

त्यामुळे पालिकेकडून नागरी सुविधा केंद्रांमधील सेवा, निविदा भरणे किंवा कार्यादेश देणे, अधिदान करणे इत्यादी काम करता येणार नाही, असे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.  (Mumbai BMC SAP Software System will be closed)

संबंधित बातम्या : 

दादरच्या शिवाजी पार्क चौपाटीवर व्ह्यूईंग गॅलरीची उभारणी, समुद्रासह सेल्फीचा आनंद लुटता येणार

मुंबई महापालिका अलर्ट मोडवर, कोरोनाची दुसरी लाट परतवून लावण्यासाठी उपाययोजना