वाहनांची तोडफोड, रस्ता रोको अन्… धारावीतील तणावाचे 10 फोटो

| Updated on: Sep 21, 2024 | 11:50 AM

गेल्या दोन तासांपासून धारावीत तणावपूर्ण स्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

1 / 10
मुंबईतील धारावी परिसरात असलेल्या एका धार्मिक स्थळाचा अनधिकृत भाग तोडण्यावरुन मोठा वाद झाला होता. त्यामुळे धारावीत तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

2 / 10
धारावी परिसरात असलेल्या एका धार्मिक स्थळाचा अनधिकृत भाग तोडण्यासाठी मुंबई महापालिकेचे पथक सकाळी पोहोचले

3 / 10
यावेळी काही लोकांनी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. तसेच काहींनी पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या वाहनाची तोडफोडही केली.

4 / 10
यानंतर काही मिनिटातच मोठ्या प्रमाणात जमाव तिथे जमा झाला आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

5 / 10
यावेळी सुरुवातीला काही लोक रस्त्यावर बसून आंदोलन करत होते. पण त्यानंतर काहींनी आजूबाजूला असलेल्या वाहनांचीही तोडफोड केली.

6 / 10
तर काही आंदोलकांकडून धारावीतून जाणारे रस्तेही रोखण्यात आले. यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पोलीस बंदोबस्तात वाढ केली.

7 / 10
यानंतर पोलिसांची स्थानिकांशी चर्चा केली. तसेच याप्रकरणी मार्ग काढण्याचा प्रयत्नही केला.

8 / 10
गेल्या दोन तासांपासून धारावीत तणावपूर्ण स्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

गेल्या दोन तासांपासून धारावीत तणावपूर्ण स्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

9 / 10
सध्या मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त, खासदार वर्षा गायकवाड आणि ठाकरे गटाचे काही पदाधिकारी धारावीत दाखल झाले आहे. त्यांनी पोलिसांची भेट घेत याप्रकरणाची संपूर्ण चौकशी करत आहेत.

10 / 10
तर या घटनेनंतर राजकीय प्रतिक्रियाही समोर येत आहेत.