पाऊस LIVE UPDATE | LTT स्थानकावरुन लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द, 5000 प्रवासी अडकले

| Updated on: Aug 04, 2019 | 7:41 PM

मुसळधार पावसामुळे मुंबईत मध्य रेल्वेची लोकल वाहतूक कोलमडली आहे. मध्य रेल्वेवर खोपोली, कर्जत ते कल्याण आणि कसारा ते कल्याण लोकल सेवा सकाळच्या वेळेत ठप्प आहे.

पाऊस LIVE UPDATE | LTT स्थानकावरुन लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द, 5000 प्रवासी अडकले
Follow us on

मुंबई : सलग दुसऱ्या दिवशी मुंबई उपनगरांसह ठाणे, कल्याण, वसई-विरार परिसरात पावसाची बॅटिंग (Mumbai Rain) सुरुच आहे. पावसाचा जोर शनिवारी रात्रभर कायम राहिल्याने मुंबईतील काही सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. मुसळधार पाऊस पडल्यामुळे मध्य रेल्वेची लोकल वाहतूक (Central Railway Local Update) व्यवस्थाही कोलमडली आहे. सुदैवाने रविवार असल्यामुळे नोकरदारांना फारसा फटका बसलेला नाही.

[svt-event title=”LTT स्थानकावरुन लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द, 5000 प्रवासी अडकले” date=”04/08/2019,7:39PM” class=”svt-cd-green” ]

मध्य रेल्वेवर शेलू आणि नेरळ स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाखालील खडी वाहून गेली

[svt-event title=”ठाणे-कल्याणदरम्यान वाहतूक सुरु” date=”04/08/2019,12:22PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”अंधेरी आणि मालाड सबवे बंद” date=”04/08/2019,10:06AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : अंधेरी आणि मालाड सब वे वाहतुकीसाठी बंद, पाणी साचल्यामुळे वाहतूक पोलिसांकडून खबरदारी, पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना [/svt-event]

[svt-event title=”वसई-विरार दरम्यान लोकल ठप्प” date=”04/08/2019,9:04AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मध्य-हार्बर रेल्वे वाहतूक बंद” date=”04/08/2019,8:49AM” class=”svt-cd-green” ] मुसळधार पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक थांबवली, प्रत्येक तासाला परिस्थिती पाहून लोकल सेवा पूर्ववत करण्याबाबत निर्णय घेणार, मध्य रेल्वेची माहिती, ट्रान्सहार्बर आणि चौथ्या मार्गावर खारकोपरकडील वाहतूक सुरु [/svt-event]

तूर्तास पश्चिम रेल्वेवरील लोकल वाहतूक सुरळीत आहे.

अंबरनाथजवळ पाणी साचल्याने लोकल खोळंबा

मुसळधार पावसामुळे सुरुवातीला मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते कल्याण रेल्वे सेवा विस्कळीत होती, तर खोपोली, कर्जत ते कल्याण आणि कसारा ते कल्याण लोकल सेवा ठप्प होती. अंबरनाथ आणि बदलापूर स्थानकांदरम्यान पाणी साचल्यामुळे अंबरनाथपासून डाऊन मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली होती. मात्र साडेआठ नंतर मध्य आणि हार्बर रेल्वे लोकलमार्ग बंद करण्याच्या निर्णय घेण्यात आला.

वडाळा-कुर्ला हार्बर सेवा ठप्प

हार्बर मार्गावर चुनाभट्टी स्थानकाजवळ पाणी साचल्यामुळे वडाळा आणि कुर्ला स्थानकादरम्यान वाहतूक ठप्प झाली होती. सीएसएमटी-वडाळा, वाशी-पनवेल आणि सीएसएमटी-अंधेरी/गोरेगाव वाहतूक सुरळीत असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या ट्विटर अकाऊण्टवरुन देण्यात आली आहे.

Rain Update | राज्यभरातील पावसाची बित्तंबातमी

लांब पल्ल्याच्या रेल्वे वाहतुकीवरही परिणाम

मुसळधार पावसाचा लांब पल्ल्याच्या रेल्वे मार्गांवरही परिणाम झालेला आहे. काही ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही इतर मार्गांवर वळवण्यात आलेल्या आहेत.

 

वसई विरार अंधारात

वसई विरार नालासोपारा शहरात पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. विरार पश्चिम बस स्थानक, विवा कॉलेज रोड, नालासोपारा पूर्व सेन्ट्रल पार्क, आचोले, तुलिंज, रेल्वे स्टेशन परिसर, अलकापुरी, धणीवबाग, संतोषभुवन, वसईतील सातीवली, नवजीवन नाका, वालीव गोलानी नाका या परिसरातील मुख्य रस्ते पाण्याखाली गेले आहेत. वसई विरार नालासोपाऱ्यात अनेक भागात वीजपुरवठाही खंडित झाला आहे.

भाईंदर आणि मिरा रोड परिसरात वाऱ्यासह जोरदार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं.

कर्जत-लोणावर रेल्वेमार्गावर दरड

कर्जत-लोणावळा रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळल्याने रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे. मिडल आणि डाऊन लेन बंद केल्याची माहिती आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी खोपोलीतून जादा एसटी गाड्या सोडून लोणावळ्यापर्यत व्यवस्था करण्यात आली आहे.