मुंबई : रेल्वेच्या मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर मार्गावर आज (2 फेब्रुवारी) मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. भायखळा ते विद्याविहारदरम्यान सकाळी 11.15 वाजेपासून सांयकाळी 3.45 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे (Megablock update). तर कुर्ला-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 वाजेपासून ते दुपारी 3.40 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे (Mumbai Megablock). तर भाईंदर ते वसई रोड दरम्यान सकाळी 11 ते दुपारी तीन वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
मध्य रेल्वे
सकाळी 10.42 वाजेपासून सांयकाळी 3.44 वाजेपर्यंत भायखळा स्थानक येथून सुटणाऱ्या डाउन धीम्या मार्गाच्या सर्व सेवा भायखळा-विद्याविहार स्थानकादरम्यान डाउन जलद मार्गावर चालविण्यात येतील. तसेच, भायखळा आणि विद्याविहार स्थानकादरम्यान परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकावर थांबतील आणि विद्याविहारपासून डाऊन धीम्या मार्गावर चालविण्यात येईल. चिंचपोकळी, करी रोड आणि विद्याविहार स्थानकातील प्रवाशांना परळ, दादर, कुर्ला आणि घाटकोपर मार्गे प्रवास करण्याची मुभा आहे.
सकाळी 11.24 वाजेपासून दुपारी 3.26 वाजेपर्यंत ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या निर्धारित थांब्या व्यतिरिक्त दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्थानकावर थांबतील आणि गंतव्य स्थानकावर 15 मिनिटे उशिराने पोहचतील. सकाळी 10.49 वाजेपासून दुपारी 3.21 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरीलया गाड्या निर्धारित थांब्या व्यतिरिक्त घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकावर थांबतील आणि गंतव्य स्थानकावर 20 मिनिटे उशिरा पोहचतील.
सकाळी 11.00 वाजेपासून सांयकाळी 5.00 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या/पोहचणाऱ्या धीम्या गाड्या गंतव्य स्थानकावर 10 मिनिटे उशिराने पोहचतील.
हार्बर रेल्वे
कुर्ला-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 वाजेपासून दूपारी 3.40 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 10.34 वाजेपासून दूपारी 03.08 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या सर्व सेवा डाउन हार्बर मार्गाच्या सेवा रद्द राहतील. सकाळी 10.21 वाजेपासून दुपारी 3.00 वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर/वाशी येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गाच्या सर्व सेवा रद्द राहतील.
ब्लॉकच्या दरम्यान छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस-कुर्ला आणि वाशी-पनेवल दरम्यान विशेष लोकल चालविण्यात येईल. हार्बर मार्गाच्या प्रवाशांसाठी सकाळी 10.00 वाजेपाससून सांयकाळी 4.30 वाजेपर्यंत ट्रान्स हार्बर मार्गावर आणि मेन मार्गावरील वाहतूक सुरु राहील.
पश्चिम रेल्वे
पश्चिम मार्गावर भाईंदर ते वसई रोड दरम्यान सकाळी 11 ते दुपारी तीन वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. ब्लॉक दरम्यान सर्व धीम्या लोकल गाड्या बोरीवली ते वसई रोड/ विरारपर्यंत जलद मार्गावर चालवण्यात येतील. तर काही गाड्या रद्द करण्यात येतील.