मुंबई : नागपूरहून हैदराबादला (Hyderabad) जाणाऱ्या एका हवाई रुग्णवाहिकेचे (Air Ambulance) मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग (Emergency Landing) करण्यात आले. या विमानात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने त्याची इमर्जन्सी लँडिग करावी लागली. या विमानात 1 रुग्ण, 1 डॉक्टर, 1 नर्स आणि वैमानिकांसह एकूण सात जण होते. सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झालेली नाही. (Mumbai Chhatrapati Shivaji Maharaj International Airport Air Ambulance Emergency Landing)
चाक निखळून पडल्याची माहिती
मिळालेल्या माहितीनुसार, C-90 VT-JIL हे बीचक्राफ्ट कंपनीचे विमान होते. या विमानाने रात्री 8 च्या सुमारात नागपूरहून हैदराबादला जाण्यासाठी उड्डाण घेतले. त्यावेळी त्यात 1 रुग्ण, 1 डॉक्टर, 1 नर्स आणि वैमानिकांसह एकूण सात जण होते. नागपूर विमानतळावरुन उड्डाण घेतल्यानंतर विमानाचा उजव्या चाकात बिघाड झाला. त्यामुळे ते चाक निखळून पडल्याची माहिती वैमानिकाला मिळाली. त्यानंतर वैमानिकाने प्रसंगावधान राखत ‘बेली लँडिंग’ प्रकारे हे विमान मुंबई विमानतळावर सुखरुप उतरवले.
A Jet Serve Aviation C-90 aircraft VT-JIL was operating an Ambulance flight from Nagpur with patient on board. While departing, a wheel separated & fell on ground. Aircraft landed in Mumbai. Crew confirmed they did a belly landing (no landing gear taken out), foam put on runway. pic.twitter.com/euUIyfQRp5
— ANI (@ANI) May 6, 2021
प्रवाशी नानावटी रुग्णालयात दाखल
यावेळी त्या हवाई रुग्णवाहिकेत एक रुग्ण होता. यावेळी त्या विमानातील वैमानिकाने त्याचे सर्व कसब पणाला लावून याची लँडिग केली. हवेत जवळपास आठ घिरट्या घेतल्यानंतर विमान सुखरुप खाली उतरवण्यात आले. या दरम्यान विमानाला आग लागण्याची भीती होती. त्यामुळे मुंबई विमानतळ प्रशासनाने अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिकेसह इतर सर्व गोष्टी सज्ज करुन ठेवल्या होत्या.
हे विमान खाली उतरवल्यानंतर त्यातील प्रवाशांना तात्काळ नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच या इमर्जन्सी लँडिंग दरम्यान अग्निशमन दलाने काही तास विमानावर पाण्याचा मारा केला. त्यामुळे त्या विमानाची उष्णता शांत झाली.
A Jet Serve Ambulance with a patient onboard lost a wheel during takeoff from Nagpur. Showing presence of mind Capt Kesari Singh belly-landed the aircraft on foam carpeting in Mumbai. All onboard are safe. Commendable effort by DGCA, Mumbai Airport & others: Civil Aviation Min pic.twitter.com/JsVEoMOAwQ
— ANI (@ANI) May 6, 2021
बेली लँडिंग म्हणजे काय?
बेली लँडिंग किंवा गिअर-अप लँडिंग म्हणजे जेव्हा एखादे विमान लँडिंग गिअरशिवाय लँड करते. त्यावेळी ते मुख्य लँडिंग डिव्हाईस म्हणून त्याच्या खाली असलेल्या किंवा बेलीचा वापर करते. सामान्यत: गिअर-अप लँडिंग हे पायलट लँडिंग गिअर वाढवण्यास विसरल्यानंतर केली जाते किंवा पायलट तांत्रिक बिघाडामुळे लँडिंग गिअर वाढवण्यास सक्षम नसतो. त्या परिस्थितीदरम्यान बेली लँडिंग केली जाते. (Mumbai Chhatrapati Shivaji Maharaj International Airport Air Ambulance Emergency Landing)
संबंधित बातम्या :
मुंबईकरांनो लक्ष द्या, ‘कोविन-ॲप’ नोंदणी आणि प्राप्त ‘अपॉइंटमेंट स्लॉट’नुसारच लसीकरण