मोदींची गाडी सुसाट धावतेय, तर विरोधकांची गाडी…; मुख्यमंत्री शिंदेंचा मविआला टोला

| Updated on: Mar 12, 2024 | 11:26 AM

CM Eknath Shinde on Mahavikas Aghadi : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा महाविकास आघाडीला टोला; नेमकं काय म्हणाले? मुख्यमंंत्र्यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. रेल्वेच्या कामावर त्यांनी भाष्य केलं. तसंच विरोधी पक्षातील नेत्यांनी शिंदेंनी टोला लगावला, वाचा...

मोदींची गाडी सुसाट धावतेय, तर विरोधकांची गाडी...; मुख्यमंत्री शिंदेंचा मविआला टोला
Follow us on

सुनील जाधव, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 12 मार्च 2024 : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. गेल्या काही वर्षात विभिन्न परियोजना मोदी यांच्या नेतृत्वात सुरू झाल्या विकासाची गाडी वेगाने सुरू आहे. विरोधी पक्षाची गाडी पटरीवर नीट उभी राहत नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गाडी मोठ्या वेगानेने चालतेय. एक गाडी रुळावर उभी राहत नाही तर दुसरी वेगात सुरू आहेत, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.

विरोधकांना टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण झालं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. लोकार्पण या ठिकाणी होत आहे. भारतीय रेल ही दुनिया मध्ये एक आश्चर्य मानलं जातं. विरोधी पक्षाची गाडी पटरीवर नीट उभी राहत नाही आणि पंतप्रधान मोदींची गाडी मोठ्या स्पीडने चालते, असं शिंदे म्हणाले. 2014 पर्यंत 4 किलोमीटर रेल्वे रूळ काम होत होतं. आता मात्र 10 ते 15 किलोमीटर वेगाने काम होत आहे. रेल्वेमध्ये अनेक योजना आणल्या, असं शिंदे म्हणाले.

विकसित भारतासाठी महाराष्ट्र मोठं योगदान

वोकल फॉर लोकल वन स्टेशन वन प्रोडक्ट सुरू केलं. 13 शे करोड रुपयांच्या रेल्वे क्यायोजना महाराष्ट्रात सुरू केल्यास यातून रोजगार उपलब्ध करून दिले. मुंबई आणि महाराष्ट्रातील 56 स्टेशनचं आधुनिकरण होत आहे. लातूरमध्ये रेल्वेचं वंदे भारत ट्रेन तयार होत आहे. विकसित भारत होण्यासाठी महाराष्ट्र मोठं योगदान देत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

याच कार्यक्रमात भाजप नेते नारायण राणे बोलत होते. पंतप्रधान मोदी हाच्या हस्ते रेल्वे प्रकल्प लोकार्पण होत आहे. गेल्या १० वर्षात मोदी यांनी विकसित भारत व्हावा म्हणून अनेक काम केलेत २०४७ पर्यंत विकसित भारत होण्याचा संकल्प केला आहे. अनेक प्रकल्प सुरू केलेत काही पूर्ण झालेत जगभरात अर्थव्यवस्था ११ नंबर वरून ५ व्या नंबर आणल आहे. आता ३ ऱ्या क्रमांकावर अनात आहेत. महारष्ट्र यात मोठा भागीदार होत आहे, असं राणे म्हणाले.