मुंबई :मुंबई कोरोना रुग्णवाढीचा (Mumbai Corona Cases) कालावधी घटला आहे. रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीत घट नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जाते आहे. मुंबई कोरोना (Mumbai Corona) नियंत्रणात जरी असला तरी गेल्या दोन आठवड्यात सक्रिय रुग्णांची संख्या वाढतेय. 10 एप्रिल रोजी 305 वर असलेली रुग्णसंख्या आता 23 एप्रिलपर्यंत 503 वर जाऊन पोहोचली आहे. मुंबईत मार्चअखएर कोरोना रुग्णांची सर्वात कमी नोंद होत होती. दिवसाला दहा हजारपेक्षा जास्त चाचण्याही केल्या जात होत्या. मात्र गेल्या दहा दिवसांत पुन्हा एकदा अल्प प्रमाणात का होईना, रुग्णवाढीनं डोकं वर काढलंय. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईसह राज्यातील कोरोना निर्बंध हटवण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क (Mask) या दोन बाबींना हरताळ फासला जात असल्याचं चित्र आहे. कोणतीही बंधनं आणि नियम नसल्यानं गर्दी होण्याचं प्रमाणही वाढलंय. त्यामुळेच रुग्ण वाढत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणंय. दरम्यान, नव्या व्हेरिएंटमुळे रुग्णवाढ होत नसल्याचंही बीएमसीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
दरम्यान, खासगी डॉक्टरांकडे असलेल्या रुग्णामध्ये कोणतीही कोरोना सदृश्य लक्षणं आढळली तर तातडीनं रुग्णाला RT-PCR चाचणी करण्यास सांगा, असे निर्देश पालिकेकडून देण्यात आले आहे. संबंधित रुग्णांना पालिकेच्या मोफत कोविड चाचणी केंद्रावर पाठवावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
#CoronavirusUpdates
24th April, 6:00pmPositive Pts. (24 hrs) – 73
Discharged Pts. (24 hrs) – 55Total Recovered Pts. – 10,39,203
Overall Recovery Rate – 98%
Total Active Pts. – 521
Doubling Rate -10129 Days
Growth Rate (17th April- 23rd April)- 0.007%#NaToCorona
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 24, 2022
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढतेय. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय गेण्यात आल्याचं पालिकेचे अतिरीक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी म्हटलंय. सद्यस्थितीत बीएमसीच्या 266 केंद्रांवर मोफच चाचणीची सोय केलेली आहे.
दुसरीकडे कोरोना व्हायरलचा ओमिक्रॉन व्हेरीएटपासूनचा धोका टाळायचा असेल, तर बुस्टर डोस घेणं आवश्यक आहे, असं तज्ज्ञांनी म्हटलंय. नॅशनल इन्स्टीच्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी बुस्टर डोसची गरज व्यक्त केली.
ओमिक्रॉनसारख्या घातक व्हेरिएंट बीए-टू ला टक्कर द्यायची असेल, तर बुस्टर डोसशिवाय पर्याय नाही, असं सांगितलं जातंय. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचा डोस घेतलेल्या रुग्णांमध्ये एन्टीबॉडीची पातळी सहा महिन्यानंतर घटू लागले. त्यामुळे बुस्टर डोस गरजेचा मानला जातोय.